21 September 2020

News Flash

Coronavirus : रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर

मीरा-भाईंदरमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ७३६ वर

संग्रहित छायाचित्र

मीरा-भाईंदरमधील करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ७३६ वर

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील करोनाबाधित रुग्णसंख्या दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर  गेला असल्याचे समोर आले आहे. तर रुग्ण वाढीचा वेगदेखील मंदावला असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येण्यात सुरुवात झाली आहे.

सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार मीरा भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या ८ हजार ७३६ वर पोहचली आहे.तर आतापर्यंत २८७ रुग्णाचा करोनामुळे  बळी गेला आहे. या परिस्थितीत रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आणि रुग्णांवर योग्य उपचार करून त्यांना करोना मुक्त करण्याचे आवाहन पालिका प्रशासनासमोर आहे. त्यामुळे प्रति दिवस शंभरच्या गतीने वाढणाऱ्या रुग्णांनादेखील योग्य उपचार करून घरी पाठवण्यात येत असल्याची  दिलासादायक बाब समोर आली आहे. यामुळे आरोग्य विभागाचा आत्मविश्वास बळावला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टाळेबंदी शिथिलतेनंतर मीरा भाईंदर शहरातील रुग्ण संख्येत वाढ झाली होती. परंतु पालिका आयुक्त डॉ.विजय राठोड यांनी पुन्हा टाळेबंदी राबवून परिस्थिती नियंत्रणात आण्याचा प्रयत्न केला.

आता शहरात प्रतिबंधित क्षेत्रांना वगळता सम विषम पद्धतीने सकाळी ९ ते ७ वाजेपर्यंत  दुकाने उघडण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे १५० सरासरी रुग्ण वाढीचा वेग १०० वर येऊन पोहचला आहे. त्याच प्रमाणे मृत्यू दर ३.२९ टक्के  वर आला असून केवळ १६.०८ टक्के रुग्णावर उपचार करणे शिल्लक राहिले आहे.

करोनामुक्त रुग्णांची संख्या ८० टक्क्यांवर

मीरा भाईंदर शहरात  एकीकडे करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे तर दुसरीकडे  दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त रुग्णचे प्रमाणदेखील वाढले आहे. आतापर्यंत तब्बल ८०.६३ टक्के  रुग्णांना करोनामुक्त करण्यात यश प्राप्त झाले असून रुग्ण दुपट्टीचा वेग ४९ दिवसांवर जाऊन पोहचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 3:15 am

Web Title: coronavirus patient double rate is 49 days in mira bhayandar zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 उद्घाटनाच्या दुसऱ्याच दिवशी कोविड केंद्राला गळती
2 करोनाचा फटका सदनिका विक्रीला
3 पालिकेची वृक्षछाटणी अर्धवट
Just Now!
X