बाजारातील गर्दी हटेना, गुरुवापर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश

वसई : करोना विषाणू संसर्गाचे प्रमाण वाढत असून सोमवारी वसईत तीन रुग्ण वाढले असून एकून रुग्णसंख्या १७ झाली आहे.  तर मीरा-भाईंदर मध्ये १७ करोनाचे रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी वसईच्या अंबाडी रोड येथील वृद्ध व्यक्तीस तर शुक्रवारी अमेरिकेहून परतलेल्या तिघा तरुणांना करोनाची लागण झाल्याचे अहवाल आले होते. मीरा-भाईंदर शहरात शुक्रवारी ७ नव्या रुग्णाची भर पडली आहे.

शनिवारी वसईच्या अंबाडी रोड येथील ओम नगरमध्ये राहणाऱ्या एका ६५ वर्षीय इसमाला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले. त्यांच्यावर नालासोपारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते एका हॉटेलात काम करत होते. शुक्रवारी अमेरिकेहून परतलेल्या तिघा तरुणांना करोनाची लागण झाल्याचे अहवाल आले होते. त्यात सोमवारी तिघांची भर पडल्याने वसईतील करोना बाधीत रुग्णांची संख्या आता १७ एवढी झाली आहे.

मीरा-भाईंदर शहरात शुक्रवारी ७ नव्या रुग्णाची भर पडल्याने शहरातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १५ एवढी झाली होती. त्यात टॅक्सीचालक, इमारतीचा सुरक्षारक्षक तसेच ३ वर्षीची चिमुकली आणि तिच्या आईचा आणि अन्य एका गृहीणीचा समावेश आहे.

या रुग्णांचा कुठलाही प्रवास इतिहास नसल्यामुळे यांच्या संपर्कात आलेल्या सर्व  नागरिकांचा शोध सुरू आहे. टॅक्सीचालक मुंबईतील विमानतळाजवळ ये-जा करत असल्याने त्याला लागण झाल आहे, तर इमारतील सुरक्षा रक्षक आणि आई-मुलीला पूर्वी समोर आलेल्या रुग्णाच्या संपर्कामुळे संसर्ग झाला आहे. परंतु गृहिणीला कोणामुळे संसर्ग झाला हे अद्याप ही कळू शकले नाही. संध्याकाळी मीरा-रोड येथील एका पिता-पुत्राला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. टाळेबंदीची सूचना असतानाही प्रादुर्भाव वाढत असल्याने अम्मलबजवणी यापूढे अधिक तिव्र होताना दिसणार आहे.

प्रशासानाने आता कठोर पावले

टाळेबंदीच्या नियमांचे नियमांचे उल्लंघन करून नागरिक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडत असल्याने प्रशासानाने आता कठोर पावले उचलली आहेत. गर्दी टाळण्यासाठी वसई-विरार शहरातील भाजीपाला व व्यापाराची सर्व दुकाने ९ एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आहेत.करोनाचे संकट वाढत असून नागरिक टाळेबंदीचे निर्बंध झुगारून खरेदीच्या नावाखाली गर्दी करत आहेत. सामानाच्या खरेदीसाठी बाहेर पडल्यावर सामाजिक दुरीचे निकषही पाळण्यात येत नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील ४ दिवस म्हणजे सोमवार ५ एप्रिल ते गुरूवार ९ एप्रिल या कालावधीत शहरातील सर्व दुकाने, भाजापाला मंडई, व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.