27 February 2021

News Flash

Coronavirus: वसई-विरार शहरात करोनाबाधितांची संख्या पोहोचली १७वर; दोघांचा मृत्यू

यातील बहुतांश रुग्ण हे एकमेकांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले आहेत.

वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. सोमवारी शहरातील करोनाबाधितांची संख्या १७वर पोहोचली. दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

वसई-विरार शहरात रविवारपर्यंत एकूण १४ करोनाबाधीत रुग्ण होते. सोमवारी त्यात ३ नव्या रुग्णांची भर पडली. यातील नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ६५ वर्षीय रुग्णाचा रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. हा रुग्ण मुंबईच्या तारांकीत हॉटेलमध्ये कामाला होता. त्याला किडनीचा त्रास होता म्हणून तो उपचारासाठी नालासोपारा येथील रिद्धी विनायक रुग्णालयात दाखल झाला होता. या मृत्यूनंतर वसईत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे.

नव्याने सापडलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण वसईच्या आनंदनगर परिसरातील असून तो पहिल्या मृत पावलेल्या रुग्णाचा नातेवाईक आहे. त्याचे वय ६७ वर्षे आहे. तर दुसरा रुग्ण नालासोपारा सेन्ट्रल पार्क परिसरात आढळला असून तो सुद्धा मुंबईच्या तारांकित हॉटेलमधील कर्मचारी असून त्याचे वय ५७ वर्षे आहे. तर वसई-पूर्व परिसरात डी मार्ट जवळ राहणारी एक ३८ वर्षीय महिला करोनाबाधित आढळली आहे. ती करोनाबाधित रुग्णाच्या सानिध्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा सर्व परिसर महापालिकेतर्फे सील करण्यात आला असून परिसर निर्जंतूक करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली आहे.

यातील बहुतांश रुग्ण हे एकमेकांच्या संपर्कात आल्याने लागण झालेले आहेत. दरम्यान, ३०हून अनेक रुग्णांचे चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित असल्याने करोनाबाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2020 5:07 pm

Web Title: coronavirus the number of corona virus patients in the city of vasai virar reaches to 17 two patients dead aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 मिरा भाईंदरमध्ये करोना बाधितांची संख्या ८
2 पालघरकरांनी सोडला सुटकेचा निश्वास, कोरोनाबधित मृताच्या संपर्कात आलेल्या २९ जणांचे नमुने निगेटिव्ह
3 वसईत करोना रुग्णाची संख्या १३, दिवसभरात चार नव्या रुग्णांची भर
Just Now!
X