News Flash

ठाणेकरांच्या खिशाला कात्री

नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर वेगवेगळ्या दरवाढीची करवत चालवली.

| March 1, 2017 11:56 am

ठाणेकरांच्या खिशाला कात्री

ठाणे महापालिकेच्या तिजोरीत वर्षभरापासून खडखडाट असल्याची ओरड सुरू असतानाच नवे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी बुधवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ठाणेकरांवर वेगवेगळ्या दरवाढीची करवत चालवली. एकाही नव्या प्रकल्पाची घोषणा नसलेल्या या अर्थसंकल्पात रहिवाशांच्या मालमत्ता आणि पाणी बिलात वाढ प्रस्तावित असून, व्यापाऱ्यांवरील स्थानिक संस्था कराच्या दरातही वाढ सुचविण्यात आली आहे.
ठाणेकरांवर करवत!
९०० कोटींच्या देण्यांचा भार पेलवेना
अर्थसंकल्पामुळे सेनेवर संकट!
करवाढ आणि दरवाढ
*बैठय़ा चाळी, झोपडपट्टी यांना दरमहा १०० रुपयांऐवजी १३० रुपये पाणीबिल
*इमारतीत रहाणाऱ्या सदनिकाधारकांना घरांच्या क्षेत्रफळानुसार पाणी बिलाची आकारणी
*मालमत्ताकरांच्या बिलांमध्ये २० टक्क्य़ांपेक्षा अधिक वाढ होण्याचा अंदाज  
*स्थानिक संस्था कराच्या दरात वाढ
*मालमत्ता करातील जलभाग कर व मलनि:सारण लाभ करात वाढ
*विकास शुल्कात वाढ
*मालमत्तेच्या क्षेत्रफळानुसार पाणी दराची आकारणी
*जाहिरात शुल्कमध्ये वाढ
*घनकचरा सेवा शुल्काची आकारणी
*अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण प्रतिबंधासाठी शास्ती व दरवाढ
*परवाना शुल्काच्या दरात वाढ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2015 2:24 am

Web Title: corporation unveils budget raises water tax and lbt
Next Stories
1 सरकारी शाळांची बत्ती गुल!
2 सलाम शूरवीरांना – भाग १ : मरता मरता मारिले..
3 क्लस्टरवरून युतीत कलगीतुरा
Just Now!
X