09 March 2021

News Flash

भिवंडीत प्रेमी युगुलाची आत्महत्या

प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मिळताच प्रियकरानेही आयुष्य संपवलं

नात्यातील तरुणाशी वर्षभरापासून प्रेमसंबंध जुळले होते. दोघांच्या भेटीगाठीही होत होत्या. मात्र आपल्या प्रेम संबंधातील लग्नाला घरातील कुटुंबीयांचा विरोध होईल या भीतीने तरुणीने माणकोली येथे मोठ्या बहिणीच्या घरी असलेल्या सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर प्रेयसीच्या आत्महत्येची माहिती मिळताच हताश झालेल्या प्रियकरानेही गळफास घेऊन आत्महत्या केली.

आरती गुरुनाथ भोईर असं आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. तर रोशन बाळासेब रंधवी या असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आरती ही प्रियकर रोशनच्या मोठ्या भावाची मेव्हणी आहे. प्रेमसंबंधांची माहिती घरातल्यांना सांगितली तर ते आपल्या लग्नाला विरोध करतील अशी भीती वाटून आरतीने गळफास घेऊन तिचे आयुष्य संपवले. तर तिच्या आत्महत्येची माहिती मिळताच रोशननेही गळफास घेतला. या दोन्ही आत्महत्यांची नोंद पोलिसांनी करून घेतली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2018 2:49 pm

Web Title: couple suicide in mankoli bhiwandi
Next Stories
1 ठाण्यात सिलिंडरमधून गॅसगळती होऊन आग
2 ठाणे स्थानक कात टाकणार!
3 ठाण्यातील पालिकेची वृक्ष लागवड वादात
Just Now!
X