News Flash

अंबरनाथ-बदलापुरात करोना बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ

शनिवारी अंबरनाथमध्ये ४८ तर बदलापूरमध्ये १४ नवे रुग्ण

ठाणे जिल्ह्यातील दोन महत्वाची शहरं म्हणून ओळख असलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात गेल्या काही दिवसांमध्ये करोना बाधित रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. अंबरनाथ शहराची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांमध्येच ५०० पार गेली आहे. शनिवारी आणखी ४८ रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे ही संख्या आता ६१७ वर पोहचली आहे. तर दुसरीकडे बदलापूर शहरात आज करोनाचे नवीन १४ रुग्ण आढळले.

गेल्या काही दिवसांपासून अंबरथान शहरात याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या लोकांचे अहवाल पॉजिटीव्ह येण्याचं प्रमाण वाढलं आहे. आतापर्यंत १९ जणांनी करोनाशी लढताना आपले प्राण गमावले आहेत. शहरातील २३४ लोकं सध्या विविध रुग्णालयाच उपचार घेत असून ११० लोकांना होम क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शहरातील १७ भाग प्रतिबंधित केले आहेत.

बदलापूर शहरानेही शनिवारी करोना बाधित रुग्णसंख्येत ४०० चा आकडा ओलांडला आहे. शनिवारी पॉजिटीव्ह आढळलेल्या १४ रुग्णांपैकी ८ रुग्ण हे याआधी बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले होते. तर उर्वरित रुग्ण हे अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते. आतापर्यंत ९ लोकांनी आपले प्राण गमावले असून २०० पेक्षा जास्त लोकांवर उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2020 7:39 pm

Web Title: covid 19 positive patients number increasing day by day in ambernath and badlapur city psd 91
Next Stories
1 Viral Video: …आणि तो गोंधळलेल्या चित्त्याला कुशीत घेऊन झोपला
2 ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघाडणी
3 प्रवासासाठी रांगा कायम
Just Now!
X