News Flash

भाईंदरमध्ये करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

करोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली होती

करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. त्यामुळे निर्बंध जरी शिथिल झाले तरी काळजी घेण्यात शिथिलता नको. (प्रातिनिधिक छायाचित्र)

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असली तरी करोनामुक्त रुग्णांच्या संख्येतदेखील वाढ होत असल्याने दिलासा व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ाभरात तब्बल दोन हजारहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाल्याने शासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील गर्दी कमी होताना दिसून येत आहे.

करोना आजाराच्या दुसऱ्या लाटेत मीरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढली होती. अशा परिस्थिती शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचाराकरिता खाटा मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याकरिता पालिका प्रशासनाकडून कठोर टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. यामुळे काहीशा प्रमाणात परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तसेच ४०० ते ५००च्या गतीने वाढणारी रुग्णसंख्या आता २०० ते २५० वर आली असून प्रति दिवस ४००हून अधिक रुग्ण करोनामुक्त होत असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.

सोमवारी समोर आलेल्या अहवालानुसार एकूण करोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६ हजार १७१ वर जाऊन पोहोचला आहे. मात्र यातील ४२ हजार ८३१ रुग्णांना करोनामुक्त करण्यात प्रशासनाला यश प्राप्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या आठवडय़ाभरात २ हजारहून अधिक रुग्णांना करोनामुक्त करण्यात आल्यामुळे काहीशा प्रमाणात स्थिती नियंत्रणात येत आहे. तसेच करोनामुक्त रुग्णांची संख्या आता ९२.७४ टक्के इतकी झाल्यामुळे अधिकाधिक बाधितांचा शोध घेऊन त्यांना करोनामुक्त करण्याचे ध्येय पालिका प्रशासनाकडून ठरवण्यात आले आहे.

करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या

दिनांक      करोनामुक्त संख्या

४ मे    —          ४९३

५ मे    —          ४१६

६ मे    —          ३७९

७ मे    —          ४५२

८ मे    —          ४१६

९ मे    —          ४८८

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2021 1:39 am

Web Title: covid 19 recovery rate crossed the 90 percent mark in mira bhayandar zws 70
Next Stories
1 ठाण्यात म्युकरमायकोसिसमुळे दोन रुग्णांचा मृत्यू; ६ जणांवर उपचार सुरू
2 गावपाडय़ांमध्ये रुग्णवाढ
3 तिसऱ्या लाटेपूर्वी प्रशासन सज्ज
Just Now!
X