19 January 2021

News Flash

करोना रुग्णालयातील खाटांची माहिती ऑनलाइन

महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’ सुरू

संग्रहित छायाचित्र

महापालिकेची ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’ सुरू

ठाणे : शहरातील करोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिका प्रशासनाने ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’ सुरू केली आहे. या सेवेच्या माध्यमातून करोना रुग्णाच्या प्रकृतीप्रमाणे त्याला योग्य त्या करोना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून या सेवेच्या माध्यमातून रुग्णवाहिका मिळवणेही सहज शक्य होणार आहे.

राज्यातील करोना साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे करोना अहवाल होकारात्मक आलेल्या रुग्णांच्या प्रकृतीनुसार  योग्य त्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, ही प्रक्रिया अतिशय गुतांगुतीची असून त्यामध्ये सुलभता आणण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ‘ऑनलाइन बेड अलोकेशन सेवा’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सेवेसाठी महापालिका प्रशासनाने एक संकेतस्थळ तयार केले आहे. या संकेतस्थळामुळे शहरातील रुग्णांना त्यांच्या प्रकृतीनुसार योग्य त्या ठिकाणी दाखल करण्याची प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे.

अशी आहे सेवा..

महापालिकेने बनविलेल्या www.covidbedthane.in या संकेतस्थळावरून वेबलिंक उघडल्यानंतर रुग्णांना आवश्यक ती माहिती भरावी लागते. ही सर्व माहिती महापालिका मुख्यालयामधील मध्यवर्ती बेड अलोकेशन पथकाला प्राप्त होते. या माहितीच्या आधारे रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड रुग्णालय यांपैकी कोठे दाखल करण्याची आवश्यकता आहे त्याचा निर्णय घेतला जातो. रुग्णाने रुग्णवाहिकेची मागणी केल्यास त्याची माहिती रुग्णावाहिका पथकाकडे पाठवली जाते. त्यानंतर संबंधित रुग्णाला सेंट्रल बेड अलोकेशन टीम आणि रुग्णवाहिकेची माहिती असणारा संदेश पाठविण्यात येतो. रुग्णांच्या मागणीनुसार त्याला कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड रुग्णालय यांपैकी कोठे दाखल व्हायचे आहे त्यानुसार रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येते. रुग्ण रुग्णवाहिकेमध्ये बसल्यानंतर त्याच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक विचारण्यात येतो. क्रमांक दिल्यानंतर रुग्णांस संबंधित रुग्णलयात दाखल केले जाते.

कोविड कॉल सेंटर

ठाणे शहरामधील नागरिकांचे करोनाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी महापालिकतर्फे ‘कोविड कॉल सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यासाठी भ्रमणधवनी क्रमांक.

’ ८६५७९०६७९१

’ ८६५७९०६७९२

’ ८६५७९०६७९३

’ ८६५७९०६७९४

’ ८६५७९०६७९५

’ ८६५७९०६७९६

’ ८६५७९०६७९७

’ ८६५७९०६७९८

’ ८६५७९०६८०१

’ ८६५७९०६८०२

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2020 2:22 am

Web Title: covid hospital bed information online zws 70
Next Stories
1 ठाण्यात ‘कोविड चाचणी’साठी डॉक्टर शिफारशीची अट रद्द
2 मीरा-भाईंदरमधील रुग्णांवर आर्थिक भार
3 टॉसिलिझमॅब इंजेक्शनमुळे १३ रुग्णांना जीवदान
Just Now!
X