News Flash

राष्ट्रज्योत संस्थेच्या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद

आदिवासी कला प्रदर्शनीमध्ये आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा समावेश होता.

कल्याणातील 'राष्ट्रज्योत' संस्थेतर्फे एका अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याणातील ‘राष्ट्रज्योत’ संस्थेतर्फे एका अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. अंध, अपंग, आदिवासी, कुष्ठरोगी, गतीमंद अशा समाजातील महत्त्वाच्या परंतु दुर्लक्षित घटकांनी आपल्या हाताने बनविलेल्या सुंदर, आकर्षक, कलाकुसरीच्या जीवनावश्यक वस्तू प्रदर्शनात विकण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामध्ये आकाशकंदील, चिमण्या, मेणाच्या पणत्या, मेणबत्त्या अशा दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा समावेश होता. त्याचप्रमाणे आदिवासी कला प्रदर्शनीमध्ये आदिवासी बांधवांनी बांबूपासून बनविलेल्या विविध वस्तूंचा समावेश होता. यामध्ये खुच्र्या, भिंतीवर लावण्यात येणाऱ्या शोभेच्या वस्तूंचा समावेश होता. या वस्तू जव्हार, मोखाडा परिसरातील आदिवासी बांधवांनी बनविलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पुण्यातील साधना व्हिलेज या प्रौढ गतीमंद मुलांसाठी कार्यरत असणाऱ्या संस्थेच्या वतीने पर्स, झोळी, पणत्या, दिवे, दिवळीसाठी भेट कार्ड आदी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

सदिच्छा, संपूर्ण बांबू केंद्र, जिव्हाळा, अस्तित्त्व, सारा फाऊंडेशन, ग्राममंगल, आदिवासी कला केंद्र, वनवासी कल्याण आश्रम, स्त्रीप्रेरणा, हिमाई महिला बचत गट, धनसंपदा महिला बचत गट, जांभिवली केंद्र, कर्जत, स्वामी विवेकानंद संस्था, साधना व्हीलेज, आधार, संगोपिता या संस्था प्रदर्शनात सहभागी झाल्या होत्या. प्रदर्शन कल्याणातील शंकरराव चौकाजवळील ओम कबड्डी संघाच्या मैदानात आयोजित करण्यात आले होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 1:20 am

Web Title: crafts exhibition by rastrajyot organization get huge responded
Next Stories
1 सेना नगरसेवकाची स्वपक्षीयास मारहाण
2 म्हाडाच्या जागेवर कब्रस्तानचे आरक्षण
3 ‘पोलीस मित्र’ हा पोलीस आणि लोकांमधला दुवा
Just Now!
X