प्रवेशद्वाराची दुरवस्था; घाणीचे साम्राज्य
माणसाच्या मृत्यूनंतर दिवसकाय्रे आदी विधी करण्यासाठी मीरा-भाईंदर महानगरपलिकेतर्फे अनेक ठिकाणी दशक्रिया विधी केंद्राची सोय उपलब्ध करून दिली आहे. परंतु मोर्वा येथील या केंद्रामुळे लोकांची गरसोयच अधिक होत आहे. गावाबाहेर एका बाजूला निर्जन ठिकाणी बांधण्यात आलेले दशक्रिया विधी केंद्र मद्यपी व गर्दुल्यांचा अड्डा बनले आहे.
मोर्वा खाडीनजीक रघुनाथ नारायण राऊत मार्गावर महानगरपालिकेने ग्रामस्थांच्या सोयीसाठी दशक्रिया विधी केंद्र बांधून दिले आहे. परंतु केंद्राचा मुख्य लोखंडी ग्रीलचा दरवाजाच गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त झाला असल्याने केंद्र दिवसभर सताड उघडे पडलेले असते. गावाबाहेर एका बाजूला असल्याने गरकृत्यांसाठी करणाऱ्यांसाठी आयतीच जागा उपलब्ध झाली आहे. अनेक वेळा दशक्रिया विधीसाठी येणाऱ्यांना केंद्रात दारूच्या बाटल्या, विडी-सिगारेटची थोटके, उरलेले खाद्यपदार्थ इतस्तत: पडलेले दिसून येतात.
विधी सुरू करण्याआधी केंद्राची साफसफाई करावी लागत असल्याने आधीच दु:खात असलेल्या नातेवाईकांची हे दृश्य पाहून मन:स्थिती आणखीनच वाईट होते. विधी केंद्राची जागाही अत्यंत अपुरी आहे. दशक्रिया विधीसाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांना अनेक वेळा उन्हात तसेच पावसात भिजत उभे राहावे लागते. केंद्राच्या आजूबाजूला शेडची व्यवस्था करून झाडे लावल्यास दिलासा मिळेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महानगरपालिकेने दशक्रिया विधी केंद्राची दुरुस्ती केली तर त्यात चालणाऱ्या गरप्रकारांना आळा बसेल. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने हे काम केले नाही तर लोकवर्गणीतून दुरुस्तीचे काम केले जाईल, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.