News Flash

अशास्त्रीय करोना उपचारप्रकरणी डॉक्टरवर गुन्हा

जिल्हा आरोग्य यंत्रणेने त्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संग्रहित छायाचित्र

बदलापूर : शासनाच्या करोना उपचार नियमावलीला झुगारून  वांगणीत एका दवाखान्यात एका खासगी डॉक्टरने करोना रुग्णांवर मनमानी उपचार सुरू केले होते.  या डॉक्टरची उपचार आणि रुग्ण बरे करण्याच्या दाव्यांची एक चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर जिल्हा आरोग्य यंत्रणेने त्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉ. उमाशंकर गुप्ता असे या डॉक्टरचे नाव असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बनसोडे यांच्या तक्रारीवरून कुळगाव पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. गुप्ता याने स्वयंघोषित उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतली नव्हती.  हा डॉक्टर रुग्णांना मुखपट्टी असल्यास प्रवेश देत नव्हता!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:10 am

Web Title: crime against doctor in corona treatment case akp 94
Next Stories
1 बदलापुरात राजकीय कुरघोडीतून टाळेबंदी?
2 ठाणेकरांचे लसीकरण आता ‘कलर कोड कुपन सिस्टम’नुसार होणार!
3 दुसऱ्या लाटेतही ‘समाजरक्षक पोलीस मित्र’ सज्ज
Just Now!
X