News Flash

हळदी समारंभात बैल नाचविल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा

करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन, रहिवासी हैराण आहेत.

संग्रहीत

कल्याण : करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासन, रहिवासी हैराण आहेत. मात्र कठोर निर्बंध आणि रात्रीची संचारबंदी लागू असताना कल्याण पूर्वेत हळदी समारंभ शुक्रवारी रात्री साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात व्हराडींसह खिल्लारी बैल नाचविले.  करोना निर्बंधाचे सर्व नियम धुडकावून हा कार्यक्रम केल्यामुळे पालिकेच्या आय प्रभाग अधिकाऱ्यांनी यजमानांवर गुन्हा दाखल केला आहे.   चिंचपाडा गावातील प्रकाश म्हात्रे यांचा मुलगा वैभव याच्या हळदीचा कार्यक्रम पोलीस, पालिकेची परवानगी न घेता शुक्रवारी रात्री ठेवला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2021 1:06 am

Web Title: crime against those involved in bull dancing at the yellow haldi ceremony akp 94
Next Stories
1 बँक ग्राहकांचे पैसे परस्पर काढले!
2 पोलिसांच्या कुटुंबियांचे लसीकरण
3 ठाण्यात ‘प्राणवायू’ची चिंता मिटणार
Just Now!
X