येथील साईराज आणि टिव्न्स बारमध्ये बुधवारी चोरी झाली. साईराज  बारच्या खिडकीची लोखंडी जाळी काढून आणि ट्विन्स बारची भिंत फोडून चोरटय़ांनी बारमध्ये प्रवेश केला आणि बारमधील एक लाख ६० हजारांचे संगीत वाद्ये चोरून नेली. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचखोर लिपिकाला अटक
कल्याण : कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गणेश देवतळे या लिपिकाला एका महिलेकडून रिक्षासाठीचे इराद प्रमाणपत्र देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणात सहभागी असलेल्या अन्य दोन दलालांवरही गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. स्वप्निल मांडे, महेश देखणे ही दलालांची नावे आहेत. महात्मा फुले पोलिस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनसाखळी चोरी
ठाणे : ब्रह्मांड विभागात राहणाऱ्या चंपावती जेम्स उल्लागड्डी (६८) यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांचे मंगळसूत्र बुधवारी मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने चोरले. या प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

मुंब्रा भागात चोरी
मुंब्रा :  आनंद कोळीवाडा परिसरात राहणाऱ्या शाहरुख मेहमूद खान (२२) यांच्या घरी बुधवारी चोरी झाली. खान यांच्या घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. तेव्हा चोरटय़ाने घराचे कुलूप बनावट चावीने उघडून आत प्रवेश केला आणि  ६५ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.