13 August 2020

News Flash

गुन्हेवृत्त – टेम्पो-कारच्या धडकेत बालिका जखमी

टेम्पोचालकाने तेथून पळ काढला असून या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेवृत्त

भिवंडी : अंजुरफाटा-माणकोली रस्त्यावर टेम्पो व कारमध्ये झालेल्या धडकेत सातवर्षीय बालिका जखमी झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. भिवंडी येथील शांतीनगर परिसरातील गैबीनगर येथे राहणारे अब्रारार खान हे व्यवसायाने चालक असून रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मुंबईचे भाडे घेऊन निघाले. यादरम्यान, अजुंरफाटा-माणकोली रस्त्यावर कृष्णा कॉम्प्लेक्ससमोर ते आले असता समोरून येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या कारला धडक दिली. या धडकेत कारमधील सात वर्षीय बालिका नवीन मेरयू हिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली आहे. तसेच इतर प्रवाशांनाही मुकामार लागला. टेम्पोचालकाने तेथून पळ काढला असून या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

३५ हजारांची घरफोडी
अंबरनाथ : बंद दरवाजे फोडण्यापासून आता उघडय़ा दारावाटे प्रवेश करून घरात चोरी करण्यापर्यंत चोरांची मजल गेली आहे. अंबरनाथ पूर्वेतील महालक्ष्मीनगर परिसरातील दिव्यशक्ती सोसायटीत एका घरात असाच चोरीचा प्रकार घडला. घरातील महिला स्वयंपाकगृहात पाणी भरत होती. घराचा दरवाजा उघडाच असल्याचे पाहून चोरटय़ाने घरात प्रवेश करून घरातील मोबाइल फोन, लॅपटॉप, पाकीट अशा वस्तू चोरून नेल्या आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

सव्वा लाखाची घरफोडी
कल्याण : पूर्वेतील काटेमानिवली परिसरातील संत रोहिदास सोसायटीत घरफोडी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. घरातील मंडळी बाहेर गेली असता चोरटय़ाने त्यांच्या घराचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील एक लाख ३९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 2:32 am

Web Title: crime news in thane 4
टॅग Crime News,Thane
Next Stories
1 बाह्यवळण रस्त्यापुढे आता भूमाफियांचे आव्हान
2 खाडी किनारीचा नक्षत्र निवास..
3 वाहनमुक्त दिवसाकडे डोंबिवलीकरांची पाठ
Just Now!
X