13 August 2020

News Flash

गुन्हेवृत्त : क्रिकेटच्या वादातून एकाची हत्या

मोहब्बत व रिजवानअली यांनी त्यांना जबर मारहाण केली, यात मकबूल यांचा मृत्यू झाला.

गुन्हेवृत्त

क्रिकेट खेळताना मुलांमध्ये झालेल्या वादाचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याची हत्या झाल्याची घटना रविवारी सकाळी दिवा येथे घडली.

येथील एकता नगर चाळीत राहणारी मुले रविवारी सकाळी चाळीच्या परिसरात क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता रेहमान खान व रेहमत अली यांच्यात वाद झाला. रेहमतने रेहमान यास मारहाण केल्याने रेहमान याने ही घटना घरी जाऊन वडील मकबूल खान यांना सांगितली. यावरून मकबूल हे त्यास जाब विचारण्यास मैदानावर गेले. या वेळी तेथे मोहब्बत अली शाह व रिजवानअली खान हे हातात लाकडी दांडके घेऊन उभे होते. मकबूल यांनी त्यांच्या हातातील दांडे काढून घेतले असता मोहब्बत व रिजवानअली यांनी त्यांना जबर मारहाण केली, यात मकबूल यांचा मृत्यू झाला.

मकबूल यांचा मुलगा इमरान खान याने दिलेल्या माहितीनुसार शीळ डायघर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे.

एक लाखाची घरफोडी

पश्चिमेतील राबोडी येथील कत्तलखाना रोड परिसरातील सय्यद जफार चाळीत शनिवारी रात्री घरफोडीची घटना घडली. घरातील उघडय़ा कपाटातून चोरटय़ांनी एक लाख सहा हजारांचा मुद्देमाल चोरून नेला असून राबोडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिठाईचे दुकान फोडले

कासारवडवली येथील महालक्ष्मी टॉवर येथील गौरव स्वीट्स दुकान चोरटय़ांनी शनिवारी रात्री फोडले. दुकानातील गल्ल्यातील साठ हजार सातशे रुपये चोरटय़ांनी चोरून नेले आहेत. प्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून  गुन्ह्य़ात सहभागी अज्ञातांचा शोध सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2015 2:56 am

Web Title: crime news in thane 6
टॅग News,Thane
Next Stories
1 जलअभयारण्याचा देखावा अन् पर्यावरणाचा ऱ्हास 
2 आंतरराष्ट्रीय अग्रस्थानाचे स्वप्न..
3 संकुल गोजिरवाण्या घरांचे..! 
Just Now!
X