14 August 2020

News Flash

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विशेष लोकलवर उडय़ा

सर्व स्थानकांत थांबत असल्याने सर्व प्रवाशांची गर्दी

संग्रहित छायाचित्र

मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच चालवण्यात येत असली तरी आता त्या लोकल सेवेतही भेदाभेदामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारी लोकल उपनगरीय रेल्वे मार्गावरील जलद थांबेच घेत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी चालवण्यात येणारी विशेष लोकल सर्व स्थानकांत थांबवण्यात येते. परिणामी आता अन्य प्रवासीही या लोकलमध्ये घुसखोरी करू लागले आहेत.

करोनाच्या टाळेबंदीत २२ मार्चपासून बंद झालेली लोकल सेवा टाळेबंदीत शिथिलता मिळाल्याने सुरू करण्यात आली. यापूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी शटल सेवा सुरू होती. सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या लोकल सध्या लहान स्थानकात थांबवल्या जात नाहीत. त्यामुळे मोजक्याच स्थानकांतील प्रवाशांना त्यातून प्रवास करता येतो. त्याच वेळी कसारा आणि कर्जत स्थानकांतून सकाळच्या वेळी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी रााखीव असलेली विशेष लोकल प्रत्येक स्थानकात थांबते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अत्यावश्यक सेवेतील इतर कर्मचारी या लोकलमधून बेकायदा पद्धतीने प्रवास करू लागले आहेत. कसारा स्थानकातून सकाळी ६ वाजून ५ मिनिटाने ही लोकल मुंबईच्या दिशेने रवाना होते. प्रत्येक स्थानकात थांबत असल्याने इतर स्थानकांतील प्रवासी या लोकलमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे टिटवाळा स्थानकात येईपर्यंत या लोकलमध्ये जागाच उरत नसल्याचे एका रेल्वे कर्मचाऱ्याने सांगितले.

अडचण काय?

सध्या रेल्वे प्रशासनाकडून कसारा-मुंबई या मार्गावर सकाळी ५ ते ९ या वेळेते कसारा स्थानकातून अवघ्या ५ लोकल सोडल्या जातात.  या लोकल अपुऱ्या पडू लागल्या असून त्यामुळे प्रवाशांची गर्दी होत आहे. त्यामुळे इतर सर्व लोकल सर्व स्थानकांत थांबवा आणि सकाळच्या वेळी लोकल वाढवा अशी मागणी आता होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:05 am

Web Title: crowd of all passengers in the special train abn 97
Next Stories
1 ठाण्यात करोना मृतांच्या आकडय़ांचा घोळ?
2 करोना रुग्णांचा २० हजारांचा टप्पा पार
3 Coronavirus : ग्रामीण भागात करोनावाढ
Just Now!
X