नालासोपारा पूर्व येथील वाघोली गावात धारधार शस्त्राने एका केबल व्यावसायिकाची रविवारी क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात नालासोपारा पोलीस घटनास्थळी पंचनामा करून हत्येचा गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सचिन नाईक (वय-४०) असे या केबल व्यावसायिकाचे नाव असून तो स्थानिक ग्रामस्थ आहे.

हत्येमागचे  नेमके कारण कळले नसले तरी पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आरोपीने नाईक यांच्यावर एका केळीच्या बागेत कोयत्याने वार करून त्यांची हत्या केली.