News Flash

वीकेण्ड विरंगुळा – ऐश्वर्या, अविनाश नारकर भेटीला

‘मॉडर्न रामायण’ आणि ‘द बिगिन’ ही बालनाटय़े या रंगोत्सवामध्ये सादर केली जाणार आहेत.

वेध अ‍ॅक्िंटग अकॅडमीतर्फे वेधच्या बालकलाकारांना त्यांची कला लोकांसमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून बालरंगोत्सव २०१६ चे आयोजन करण्यात आले आहे. ३ जानेवारीला दुपारी ४ वाजता काशीनाथ घाणेकर नाटय़गृहात हा कार्यक्रम पार पडणार असून ३ वेगवेगळ्या बालनाटय़ांद्वारे ठाण्यातील ३५ बालकलाकारांना व्यासपीठ मिळणार आहे. सोलापूरच्या बालनाटय़ संमेलनामध्ये सादर झालेल्या ‘शूटिंग शूटिंग’ या बालनाटय़ाचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर ‘मॉडर्न रामायण’ आणि ‘द बिगिन’ ही बालनाटय़े या रंगोत्सवामध्ये सादर केली जाणार आहेत.

मनोरंजनात्मक माध्यमातून सामाजिक संदेश लोकांपुढे पोहोचविण्याचा प्रयत्न या बालनाटय़ांच्या माध्यमातून केला जाणार आहे. बालरंगोत्सव २०१६ या महोत्सवात सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेते व दिग्दर्शक अविनाश नारकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

मधुरा ओक, नीलय घैसास, अनुजा मोहोरे, अंकिता पाटील यांनी या नाटकांचे दिग्दर्शन केले आहे. कार्यक्रमाच्या प्रवेशिका उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ९८२०२२५९५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

कधी- रविवार, ३ जानेवारी, वेळ : दुपारी ४ वाजता

कुठे- काशीनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.)

रांगोळ्यांच्या विविध छटा

सणांमध्ये आणि शुभ कार्यात हमखास घराच्या दारात पाहायला मिळणारी आकर्षक रांगोळी प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत असते. रेखीव पांढरी रांगोळी आणि त्यात विविध रंगांची सरमिसळ यामुळे रांगोळी अधिक खुलून दिसते. ही रांगोळी काढण्याची विशिष्ट पद्धत अवगत असेल तर अनेक हातांमधून रांगोळी कला साकारत जाते. पारंपरिक रांगोळीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने रंगवल्ली परिवारातर्फे रांगोळी रसिकांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विविध प्रात्यक्षिकांद्वारे पाण्यावरील रांगोळी, पाण्याखालील रांगोळी , फुलांचा गालीचा, धान्यांची कलात्मक रांगोळी आणि रंगीत रांगोळ्यांचे नक्षीकाम अशा पाच प्रकारच्या रांगोळ्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सहभाग घेण्यासाठी संपर्क- ९८६९४६५३३६ किंवा ९८१९२७१०२१.

कधी – रविवार ३ जानेवारी, वेळ – सकाळी ११ ते सायंकाळी ४

कुठे – नौपाडा हिंदू भगिनी मंडळ, पूजा अपार्टमेंट, पेंडसे लेन, ब्राह्मण सोसायटी, नौपाडा, ठाणे (प.)

रॉक, पॉप, जॅझ

भारतीय संगीताला शेकडो वर्षांची परंपरा आहे. या संगीताने पाश्चिमात्य संगीताला आपलेसे केले आहे आणि अलीकडे पाश्चिमात्य संगीतानेही भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेले सामावून घेतले आहे. रॉक, पॉप, जॅझ, हिपहॉप अशा विविध लोकप्रिय पाश्चिमात्य संगीत प्रकारांबरोबर भारतीय संगीताची अशी एक आगळी मैफल ठाण्याच्या विवियाना मॉलमध्ये आयोजित करण्यात आली आहे. एक नॅशनल स्कूल ऑफ परफॉर्मिग आर्टचे विद्यार्थी ध्रुव राठोड, केनिल सांगवी, प्रयाग शेनॉय, राहुल नायक, तेजस पारेख हा आगळा वेगळा कार्यक्रम सादर करणार आहेत.

कधी- शनिवार, २ जानेवारी रोजी, वेळ-सायंकाळी ६ ते रात्री ८

कुठे- विवियाना मॉल, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे(प.)

दागिन्यांचा लखलखाट

महिलावर्गाला दागिन्यांचे कायमच आकर्षण असते. त्यांची ही हौस पुरविण्यासाठी ठाण्यातील ठाकूरवाडी नेहमीच सज्ज असते. सोने, चांदी, मोती अशा पारंपरिक धातूंबरोबरच प्लॅटिनम, अमेरिकन डायमंड्स, ऑनिक्स, अशा इतर प्रकारांतही दागिने मिळतात. सोन्या-चांदीच्या किमती कितीही चढय़ा असल्या, तरी दागदागिन्यांची हौस अजिबात कमी होत नाही. पारंपरिक भारतीय दागिन्यांमध्ये जयपूर पद्धतीच्या दागिन्यांना खूप महत्त्व आहे. कुंदन मीनाकाम हे जयपुरी संस्कृतीच्या दागिन्यांचे वैशिष्टय़. सध्या लाल-हिरव्या-निळ्या कुंदनांनी सजलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन ठाण्यातील गोखले रोडवरील ठाकूरवाडी येथे भरविण्यात आले आहे.

कुठे- ठाकूरवाडी, पानेरी साडीच्या समोर, ठाणे(प)

कधी- दररोज दुपारी १२ ते रात्री ९

भारतीय हस्तकलेचे दर्शन

सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे खरेदी. लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वाना खरेदी करायला आवडते. अशा खरेदीप्रेमींसाठी यंदा हस्तकलेच्या वस्तूंची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. ठाण्यामध्ये सुरू असलेल्या ‘भारतीय हस्तशिल्प बाजार’मध्ये अशाच हस्तकलेच्या वस्तूंचे भव्य प्रदर्शन सुरू आहे. यामध्ये हातमागावरील शाली, कुर्ती, विविध भागांतील चित्रकारांनी काढलेली आकर्षक चित्रे, तसेच विविध राज्यांमधील वैशिष्टय़पूर्ण वस्तू या प्र्दशनात मांडण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आर्टिफिशियल फुले, क्रॉकरी, लेडीज पर्स, साडय़ा, बनारसी वस्तू तसेच खाद्य पदार्थामध्ये फरसाण, लोणची, मसाले, मलावणी पदार्थ आशा विविध वस्तू व खाद्य पदार्थाची रेलचेल या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळते. एकूणच भारतीय हस्तकला आणि शिल्पकला यांचा संगम साधणारे असे हे प्रदर्शन आहे.  हे प्रदर्शन २८ डिसेंबरपासून सुरू झाले असून ३ जानेवारीपर्यंत पोलीस परेड ग्राऊंड, कोर्ट नाका, सेंट्रल जेलजवळ, ठाणे (प.)येथे सर्वासाठी खुले राहणार आहे.

कधी- रविवार, ३ डिसेंबपर्यंत सुरू

कुठे- पोलीस परेड ग्राऊंड, कोर्ट नाका, सेंट्रल जेलजवळ, ठाणे(प.)

कबीर फेस्टिव्हल

कबीराचे दोहे हे अनमोल लोकधन आहे. त्यांच्या सुभाषितांना उंची लाभली आहे. कारण त्यातून त्यांची अंतर्मुख वृत्ती, कठोर आत्मपरीक्षण, डोळस श्रद्धा, अनुभव, सूक्ष्म अवलोकन, परखडपणा, प्रासादिकता आदी वैशिष्टय़े प्रकटतात. त्यांचा हाच ठेवा गोष्टींच्या व गाण्याच्या स्वरूपात मांडण्यासाठी सहेज फाऊंडेशनतर्फे कबीर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. हा फेस्टिव्हल मुंबई व ठाण्यामध्ये होणार असून सर्वासाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत काशिनाथ घाणेकर नाटय़गृहामध्ये ‘दास्ता दाही अखार की’ हा कबीरावरील कार्यक्रम सादर होणार आहे, तसेच कबीरांवर आधारित सांगीतिक कार्यक्रमही या वेळी सादर होणार आहे.

कधी- गुरुवार, ७ जानेवारी, वेळ : सायंकाळी ६ ते रात्री १०

कुठे- काशिनाथ घाणेकर नाटय़गृह, ठाणे(प.)

उत्तरेची खाद्यसफर

खाद्य संस्कृती हा सर्वाच्याच जिव्हाळ्याचा विषय. ही संस्कृती जोपासावी कशी आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले कसे पुरवावे याचे प्रशिक्षण देण्यासाठी कोरम मॉल व्यवस्थापनाने आठवडय़ाच्या दर बुधवारी खास महिलांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले आहे. येत्या बुधवारी उत्तर भारतातील वैविध्यपूर्ण खाद्य पदार्थ आणि त्याच्या पंगती कशा रचाव्यात याची कार्यशाळा घेण्यात येणार आहे. यामध्ये पराठा टॉको, छोले हॉट डॉग, स्टफ कुलचा, आलू गोबी मंचुरियन अशा चटकदार पदार्थनिर्मिती  याची माहिती देण्यात येईल.

कधी- बुधवार, ६ जानेवारी, वेळ : दुपारी ३ ते  ८

कुठे- कोरम मॉल, मंगल पांडे मार्ग, पुर्वद्रुतगती मार्ग जवळ, ठाणे(प.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2016 3:27 am

Web Title: cultural event in thane 2
टॅग : Thane
Next Stories
1 मुंबई साप्ताहिकी- भालचंद्र पेंढारकर यांच्यावरील ‘ध्यासयात्रा’ संगीतमय कार्यक्रम
2 परदेशी पाहुण्यांचे ठाणे
3 ठाणे जिल्ह्यत येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांची ओळख..
Just Now!
X