25 April 2019

News Flash

ठाण्यात उद्या, रविवारी सांगीतिक नजराणा

१७ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज विजेत्यांची निवड करण्यात येत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी

ठाणे : ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये येत्या शनिवार आणि रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षिसे जिंकण्याची संधीही ठाणेकरांना मिळणार आहे. येत्या शनिवारी, ९ फेब्रुवारी रोजी ‘फोक मस्ती’ हा तरुणांचा बँड सादरीकरण करणार आहे. रविवार, १० फेब्रुवारी ‘जीवनगाणी’ हा कार्यक्रम होणार आहे.

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’मध्ये सहभागी झालेल्या दुकानांना बुधवारी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी भेट दिली. यावेळी या दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना मृणाल यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

खेळ आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी होऊन गिफ्ट कूपन जिंकण्याची संधीही या महोत्सवात मिळत आहे.

‘फोक मस्ती’ हा बँड भारतीय आणि पाश्चात्त्य संगीताचा आनोखा मिलाफ साधून गाणी सादर करतो. या बँडमध्ये सामान्य माणसाच्या जीवनातील घडामोडींचे गाण्यांच्या माध्यमातून सादरीकरण केले जाते. ‘फोक मस्ती’ बँडमध्ये विपुल पांचाल, समाधान गुलदगडे, रोशन आडे, अमय चोपा आणि प्रिन्स मँगन हे तरुण कला सादर करणार आहेत. तर रविवारी ‘जीवनगाणी’ कार्यक्रमात जुन्या-नव्या गीतांची मैफल होणार आहे. या कार्यक्रमात चिंतामणी सोहनी आणि अपर्णा नागरगट्टे गायन करणार असून कुणाल रेगे निवेदन करणार आहेत.

१७ फेब्रुवारीपर्यंत सुरू असणाऱ्या या खरेदी उत्सवात दररोज विजेत्यांची निवड करण्यात येत आहे. त्यांना एक ग्रॅम सोन्याची आणि चांदीची नाणी व अन्य आकर्षक भेटवस्तू देण्यात येत आहेत. फेस्टिव्हलच्या अखेरीस पहिल्या भाग्यवान विजेत्यास कार आणि दुसऱ्या विजेत्याला सहलीचे पॅकेज अशी पारितोषिके देण्यात येतील.

कधी?

शनिवार, ९ फेब्रुवारी आणि रविवार, १० फेब्रुवारी, वेळ – सायंकाळी ६.३० ते ९

कुठे?

कुठे? – गणेश विसर्जन घाट, साईकृपा हॉटेलसमोर, मासुंदा तलाव, ठाणे (प).

प्रायोजक

रिजन्सी ग्रुप प्रस्तुत ‘लोकसत्ता ठाणे शॉपिंग फेस्टिव्हल’ हा पितांबरी आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने होत आहे. ईशा टुर्स हे या शॉपिंग फेस्टिव्हलचे ट्रॅव्हल पार्टनर आहेत. वास्तू रविराज, ऑर्बिट, चिंतामणी ज्वेलर्स, जीन्स जंक्शन, मिलसेन्ट आणि टिपटॉप प्लाझा हे असोसिएट पार्टनर आहेत. डीजी ठाणे हे या खरेदी उत्सवाचे डिजिटल पार्टनर आहेत. तसेच तन्वीशता, अनंत हलवाई, हॅलो प्रवासी, रांका ज्वेलर्स, क्रिष्णा स्वीट आणि लिनन क्लब हे पॉवर्ड बाय प्रायोजक आहेत. वामन हरी पेठे सन्स, शुभकन्या, गडकरी कट्टा आणि कुलस्वामिनी साडी हे प्लॅटिनम पार्टनर आहेत, तर सरलाज स्पा अँड सलोन, कलामंदिर आणि एनरिच सलोन हे गिफ्ट पार्टनर आहेत. लँन्डमार्क मर्सिडीज हे लक्झरी कार पार्टनर आहेत. प्रॉम्पक्राफ्ट हे प्लॅटिनम पार्टनर असून ब्रह्मविद्या हे हिलिंग पार्टनर आहेत.

First Published on February 8, 2019 1:31 am

Web Title: cultural events in loksatta thane shopping festival