News Flash

पाणीपट्टी चुकवणाऱ्यांचे नळ बंद

थकबाकीदारांची नळजोडणी तोडण्याचे आदेश

थकबाकीदारांची नळजोडणी तोडण्याचे आदेश

एकीकडे कर भरण्यासाठी पाचशे, हजाराच्या नोटा स्वीकारत ठाणे महापालिका आपल्या तिजोरीत भर पाडत असतानाच दुसरीकडे अशी संधी मिळूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील पाणीपट्टी थकबाकीदारांची नळजोडणी तोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. गेल्या तीन दिवसांत पालिकेने अशा १२० नळजोडण्या बंद केल्या असून यापुढे ही कारवाई आणखी वेगवान करण्यात येणार आहे.

चलनातील हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर या नोटा बँकांबरोबरच शासकीय देणी फेडण्यासाठीही स्वीकारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांकडे असलेल्या बाद नोटा खपवल्या जात आहेतच, शिवाय पालिकेच्या उत्पन्नातही भर पडत आहे. मात्र एकीकडे अशी सवलत दिली जात असतानाच, अजून्ही कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर कडक कारवाई करण्याचा पवित्रा पालिका प्रशासनाने घेतला आहे. ठाणे महापालिका हद्दीतील पाणीपट्टी थकबाकीदारांच्या नळजोडण्या तोडण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार शनिवारी वागळे, रायलादेवी आणि दिवा प्रभागांमध्ये मोठय़ा प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. पाणी कर थकबाकीदारांची नळ संयोजने खंडित करण्यात आल्याची महापालिकेच्यावतीने सांगण्यात आले. या कारवाईअंतर्गत जवळपास १२० नळ संयोजने खंडित करण्यात आली आहेत. सोमवार हा जुन्या चलनाच्या माध्यमातून कर भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतरही थकबाकी कायम असणाऱ्यांवर १५ नोव्हेंबरपासून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. दरम्यान, रविवारी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी पालिकेच्या विविध कर संकलन केंद्राना भेट देऊन वसुलीचा आढावा घेतला. तसेच रहिवाशांना सोयीचे ठरेल अशा पद्धतीने आणखी काही केंद्रे सुरू करता येतील का, याचाही आढावा घेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 12:58 am

Web Title: cut the water connection in thane
Next Stories
1 नोटा बदलण्यासाठी रोजंदारांची नेमणूक
2 शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवाद
3 आहे मनोहर तरी..
Just Now!
X