पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात आज पहाटेपासून भूकंपाचे धक्के पुन्हा बसू लागले असून 3.6 तीव्रतेचा धक्का आज सकाळी सात वाजून सहा मिनिटांनी बसला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू डहाणूच्या पूर्व भागात असला तरी संपूर्ण डहाणू तालुक्यात या भूकंपाची तीव्रता जाणवली. तत्पूर्वी पहाटे 03:57 वाजता डहाणू औष्णिक ऊर्जा प्रकल्पा समोर केंद्रबिंदू असलेल्या 3.5 तीव्रता असलेला धक्का बसला होता.

त्याच बरोबरीने 03.29 (3.5) तारापूर समोरील तारापुर समोरील समुद्रात, 03.43 (2.8) डहाणू डहाणु समोरील समुद्रात, 03.45 (2.6) आगवन भागात, 03.53 (2.6) सावटा येथे, 05.04 (2.2) बडापोखरण, 05.45 (2.5) नरपड समोरील समुद्रात केंद्र बिंदू असलेले भूकंपाचे धक्के बसले.

या सलग बसणाऱ्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.