01 October 2020

News Flash

डहाणूच्या कासव उपचार- पुनर्वसन केंद्राला नव्याने उभारी

विविध प्रजातींच्या हजारो जखमी समुद्री कासवांना जीवदान व उपचार देणाऱ्या डहाणू येथील कासव उपचार व पुनर्वसन केंद्राला नवी उभारी मिळणार आहे.

कासव उपचार व पुनर्वसन केंद्र, डहाणू

अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही

लोकसत्ता वार्ताहर

पालघर : विविध प्रजातींच्या हजारो जखमी समुद्री कासवांना जीवदान व उपचार देणाऱ्या डहाणू येथील कासव उपचार व पुनर्वसन केंद्राला नवी उभारी मिळणार आहे. या केंद्रात अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुंबई कांदळवन कक्षांचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक वीरेंद्र तिवारी यांनी दिल्याने या केंद्राला दिलासा मिळाला आहे.

डहाणू तालुक्यात असलेले हे केंद्र भारतातील पाहिले समुद्री कासव उपचार व पुनर्वसन केंद्र आहे. वन विभाग आणि वाइल्डलाइफ कंझव्‍‌र्हेशन अँड अ‍ॅनिमल वेल्फेअर असोसिएशन या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ते आजही सुरू आहे. कासव संवर्धनासाठी असलेल्या या वैशिष्टपूर्ण केंद्राला अनेकजण आजही आवर्जून भेट देतात. अपर प्रधान मुख्य वन संरक्षक वीरेंद्र तिवारी, उपवन संरक्षक निनू सोमराज यांनी पालघर कांदळवन कक्षाच्या वन परिक्षेत्र अधिकारी मंजिरी केळुस्कर यांच्यासह फाऊंडेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून केंद्रातील कामाचा आढावा घेऊन पाहणी करण्यात आली. मुंबई ते गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांसह इतर ठिकाणी आढळलेल्या जखमी कासवांवर येथे उपचार सुरू असून त्यांचे संवर्धन करत असल्याबद्दल तिवारी यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.

केंद्रात उपलब्ध सुविधा आणि तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा यांचा आढावा घेऊन या केंद्राच्या विस्तारासाठी आणि अद्ययावत करण्यासाठी विशेष प्रयत्न करून केंद्राला नवी उभारी देण्यात येईल, अशी  ग्वाही तिवारी यांनी यावेळी दिली. शक्य तितक्या लवकर शासकीय प्रक्रियेनुसार या सुविधा प्राप्त करून दिल्या जातील. जेणेकरून या केंद्राला आणखीन बळकटी मिळणार आहे, असेही तिवारी यांनी भेट दिल्यानंतर सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:49 am

Web Title: dahanu turtle treatment and rehabilitation center dd70
Next Stories
1 विद्यार्थ्यांना घरपोच दाखले
2 करोनाचा वाडा एसटी आगाराला फटका
3 सीमा भागातून गुटख्याची आवक सुरूच
Just Now!
X