19 February 2020

News Flash

मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे डॉक्टरला मारहाण

मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात  श्री बालाजी  नावाने  डॉ. नीलेश डाहुले  यांचा दवाखाना आहे. 

वडिलांच्या निधनानंतर डॉक्टरानी मृत्यू प्रमाणपत्र न दिल्यामुळे संतप्त  झालेल्या मुलांनी डॉक्टरच्या दवाखान्यात जाऊन  तोडफोड केल्याची आणि डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना मिरा रोडच्या  रामदेव पार्क परिसरात  घडली.

मीरा रोडच्या रामदेव पार्क परिसरात  श्री बालाजी  नावाने  डॉ. नीलेश डाहुले  यांचा दवाखाना आहे.  आरोपी  योगेश मिश्रा व त्यांचे कुटुंब हे डॉ. निलेश यांच्याकडे गेल्या ८  वर्षांपासून उपचारासाठी नेहमी येत असत.  गेल्या आठवडय़ात वडिलांची तब्येत खालावल्याने मिश्रा यांनी  डॉक्टरांना संपर्क केला परंतु मुलाच्या आजारपणामुळे आपण येऊ शकत नसल्याचे डॉक्टरांनी कळवले तसेच  दुसऱ्या डॉक्टरांची सोय करून देत असल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी  मिश्रा यांचा  मिस कॉल पाहून   डॉक्टरांनी  दूरध्वनी केला असता त्यांच्या  वडीलांचा मृत्यु झाल्याचे समजले. मृत्युप्रमाण  पत्राची  मागणी केली असता  डॉक्टरांनी ८ वाजता येऊन देत  आल्याचे  सांगितले. पण त्या नंतर मिश्रा यांचा  डॉक्टरांना फोन आला नाही.  संतप्त  मिश्रा दवाखान्यात आला त्याच्यासोबत आणखी एकजण होता.  त्यांनी दवाखान्याच्या काचा फोडल्या, डॉक्टरांचा मोबाइल  हिसकावून  दमदाटी करून मारहाण केली. त्यानंतर दोघेही पळून गेले .

First Published on September 10, 2019 3:47 am

Web Title: death certificate doctor fight akp 94
Next Stories
1 ठाण्यातील चौकांत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून चाचपणी
2 नागरी वस्तीत माकडांचा धुमाकूळ
3 शिळफाटा-महापे मार्गावर अवजड वाहतुकीस प्रवेशबंदी
Just Now!
X