29 November 2020

News Flash

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर

सर्व मृतांची ओळख ठाणे महापालिकेने पटवली असल्याची माहिती

भिवंडी शहरातील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळली होती. त्यानंतर एनडीआरएफ जवानांकडून या ठिकाणी मदत व बचावकार्य सुरू झालं होतं. आज सकाळी हाती माहितीनुसार या दुर्घटनेतील मृतांची संख्या ३९ वर पोहचली आहे.  एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे. तसेच, ठाणे महापालिकेने या दुर्घटनेतील सर्व मृतांची ओळख देखील पटवली असल्याचे सांगण्यात येत आहे.

इमारत दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. तसेच, या दुर्घटनेची चौकशी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आजखमींना महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. भिवंडी महापालिकेने शहरातील १०२ धोकादायक इमारती रिकाम्या केल्या असून, अशा प्रकारच्या इमारतींचा आढावा सातत्याने प्रशासनाकडून घेतला जातो, असेही शिंदे यांनी सांगितले आहे.

सुमारे ४५ वर्षे जुन्या या इमारतीत ४० कुटुंबं राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश होता. ही इमारत रिकामी करण्याची नोटीसही महापालिकेने बजावली होती. जिलानी इमारत दुर्घटनाप्रकरणी तत्कालीन प्रभाग समिती -३ साहाय्यक आयुक्त सुदाम जाधव आणि अभियंता दुधनाथ यादव यांना तातडीने निलंबित करण्याचे आदेश भिवंडी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 23, 2020 8:30 am

Web Title: death toll rises to 39 in the bhiwandi building collapse incident msr 87
Next Stories
1 धोकादायक इमारतींवर बडगा
2 इमारत दुर्घटनेप्रकरणी चौकशी समिती
3 ठाण्यातील ५० टक्के सीसीटीव्ही बंद
Just Now!
X