29 May 2020

News Flash

लोकलमध्ये प्रसुती

महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

संग्रहित छायाचित्र

मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये प्रसुती झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या महिलेला तात्काळ ठाणे रेल्वे स्थानकातील वन रूपी क्लीनिकमध्ये दाखल करण्यात आले. महिला आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

नवी मुंबईत राहणाऱ्या मंगल काळे या शनिवारी रात्री मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येत होत्या. लोकलमध्ये त्यांना प्रसुती वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर लोकलमधील महिलांनीच त्यांची प्रसुती केली. ठाणे रेल्वे स्थानक आल्यानंतर मंगल यांना  तपासणीसाठी ठाणे रेल्वे स्थानकातील वन रूपी क्लीनिकमध्ये दाखल केले. त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याचा सल्ला क्लीनिकमधील डॉक्टरांनी दिल्याची माहिती वन रूपी क्लीनिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल घुले यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2019 1:32 am

Web Title: delivery in local train abn 97
Next Stories
1 मनसेकडून डोंबिवलीत आंदोलनातून युतीची खिल्ली
2 मुंब्रा-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी
3 तरुणीवर लैंगिक अत्याचार
Just Now!
X