04 August 2020

News Flash

 ‘उपयुक्त औषधे खरेदी करा!’

करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी महागडय़ा औषधांचा वापर  केला जातो.

ठाणे : करोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांच्या उपचारासाठी रेमडीसिवीर, टॉसिलिझुमब इंजेक्शन आणि फेविपिरावीर गोळ्यांचा वापर करण्यात येत आहे. या महागडय़ा औषधांचा खर्च सामान्य आणि मध्यमवर्गीय ठाणेकरांना परवडत नसल्यामुळे महापालिकेतर्फे या औषधांचा साठा खरेदी करण्याची मागणी सत्ताधारी शिवसेनेसह भाजपने पालिका आयुक्तांकडे केली.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या वाढीचे प्रमाण विशेषत: झोपडपट्टी आणि चाळींच्या परिसरात अधिक आहे. करोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी महागडय़ा औषधांचा वापर  केला जातो. या इंजेक्शनसाठी १२ हजार ५०० रुपयांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. अनेक रुग्णांना ४० हजार रुपयांची दोन इंजेक्शने देण्याची शिफारस डॉक्टरांकडून करण्यात येते. तसेच  फेविपिरवीर गोळ्याही महागडय़ा आहेत. या औषधांमुळे रुग्ण बरे होण्यास मदत होत असली तरी त्यांचा खर्च सामान्य आणि मध्यवर्गीयांना परवडत नाही. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी पक्षात असलेल्या भाजपने या औषधांचा साठा विकत घ्यावा, अशी मागणी केली आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी आयुक्त डॉ. विपनी शर्मा यांच्याकडे मंगळवारी एक पत्र पाठवून हा साठा उपलब्ध करण्याची गरज व्यक्त केली आहे. औषधांचा खर्च सामान्य ठाणेकरांना परवडत नसून केवळ आर्थिक परिस्थितीमुळे अनेक रुग्ण उपचार घेऊ  शकत नाहीत. त्यामुळे महापालिकेने औषधांचा साठा खरेदी करून त्याचा उपचारासाठी वापर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2020 1:21 am

Web Title: demand for purchase of remdesivir tocilizumab injection and favipiravir tablets zws 70
Next Stories
1 टाळेबंदीत डोंबिवलीतील रिजन्सी संकुलात घरगुती बाजारपेठ
2 पाणी योजनांचे सक्षमीकरण
3 करोनावरील उपचारांसाठी वसईतील खाजगी रुग्णालयांत वाढ
Just Now!
X