आज मध्यरात्री पाच तासांचा ब्लॉक

मुंबई : ठाणे स्थानकातील कल्याण दिशेला असलेला जुना पादचारी पूल पाडण्यात येणार असून त्यानिमित्ताने १८ जानेवारीला रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

कळवा ते मुलुंड दरम्यान अप धीम्या मार्गावर आणि मुलुंड ते दिवा दरम्यान डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. कल्याण स्थानकातून सुटणाऱ्या धीम्या लोकल पहाटे ३.२९ ते पहाटे ५.०९ वाजेपर्यंत दिवा ते मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर धावतील.

१८ जानेवारी डाऊन लोकल फेऱ्या

* सीएसएमटी ते कल्याण रा. ९.५४ रद्द

* सीएसएमटी ते कल्याण रा.१०.२४ ची लोकल कुर्लापर्यंतच

* सीएसएमटी ते ठाणे रा. ११.०४ ची लोकल कुर्लापर्यंतच

* सीएसएमटी ते ठाणे रा. १९ जानेवारी ११.५९ ची लोकल रद्द

अप लोकल फेऱ्या

* कल्याण ते सीएसएमटी रा.११.०५ रद्द

* आसनगाव ते ठाणे रा. ११.०८ ची लोकल कल्याणपर्यंत

* कल्याण ते ठाणे रा. ११.४७ ची लोकल रद्द

डाऊन लोकल फेऱ्या

* सीएसएमटी-ठाणे रा. १२.२८ रद्द

* सीएसएमटी-अंबरनाथ प. ५.४० रद्द

* कुर्ला-कल्याण (प. ५.३९) रद्द

अप लोकल फेऱ्या

*  ठाणे ते सीएसएमटी प. ४.००, ४.२० आणि ५.०६ ची लोकल रद्द

* ठाणे ते सीएसएमटी प. ४.४० ची लोकल कुर्लातून सुटेल

*अंबरनाथ ते सीएसएमटी प. ६.१० ची लोकल ठाणेतून सुटेल