‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या निमित्ताने ठाण्यात आज आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन 

ठाणे : योग्य आहारपद्धती म्हणजे नक्की काय आणि कुणासाठी कोणती आहारपद्धती योग्य आहे, हे आहारतज्ज्ञ आणि त्याचे नीट पालन करणारेच सांगू शकतात. यंदाचा ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चा अंक आहारतज्ज्ञाबरोबरच नामवंतांचे, लोकप्रिय कलाकारांचे अनुभव सांगणाराही आहे. ‘स्वादिष्ट पण पौष्टिक’ हे सूत्र असणाऱ्या या विशेषांकात १८ आहारतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले असून त्याच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशनानिमित्त गुरुवार, ५ जुलै रोजी सहयोग मंदिर हॉल, ठाणे येथे ६ वाजता एका खास कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या वेळी या विशेषांकातील आहारतज्ज्ञ तसेच शेफही मार्गदर्शन करणार आहेत.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक

माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर यांसारख्या हिंदी चित्रपट कलाकारांबरोबरच मृणाल कुलकर्णी, अमृता सुभाष, सुनील बर्वे यांची आहारपद्धती कशी आहे, काय असतात त्यांच्या दिवसभराच्या खाण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी, हेही या विशेषांकातून जाणून घेता येणार आहे.

याशिवाय कुणाला कोणती आहारपद्धती योग्य, याविषयी १८ आहारतज्ज्ञ ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या वाचकांना मार्गदर्शन करणार आहेत, ते आहारपद्धतींची माहिती तसेच त्या-त्या आहारपद्धतींतील पाककृती सांगून. यात वेगन, किटोजेनिक, मॅक्रोबायोटिक, व्हीएलसीडी, डॅश यासह इतर आहारपद्धती, गर्भवती, मधुमेही, वृद्ध आणि रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी असणाऱ्या आहारपद्धतींची माहिती या तज्ज्ञांनी दिली आहे.

या १८ आहारतज्ज्ञांचे प्रतिनिधित्व करत शिल्पा जोशी, ऐश्वर्या कुंभकोणी, सुखदा भट्टे-परळकर आणि शेफ शंतनु गुप्ते या कार्यक्रमात सहभागी होणार असून काय खावे? कसे खावे? यावर मार्गदर्शन करणार आहेत. वाचकांनाही या वेळी आपल्या मनातील प्रश्न, शंका या आहारतज्ज्ञांना विचारता येणार आहेत.

कधी?

५ जुलै रोजी, सायं. ६ वा.

कुठे?

सहयोग मंदिर सभागृह, ठाणे