मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टय़ा लागल्या की जागोजागी पावसाळ्यातील छत्र्यांप्रमाणे विविध ‘उन्हाळी शिबिरांचे’ पेव फुटतात. बहुतेक शिबिरे एप्रिल – मे महिन्यानंतर शाळा सुरू झाल्या की बंद होतात. ठाण्यात मात्र काही शिबिरे वर्षभर नियमितपणे सुरू असतात. काही बारमाही शिबिरे मुलांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्व विकासात महत्त्वाची भूमिका बजावीत आहेत. मुलांच्या जडणघडणीत शाळा आणि पालकांबरोबरच या शिबिरांचाही खारीचा वाटा आहे. अशाच काही शिबिरांची ही थोडक्यात ओळख..  
१) सरस्वती मंदिर ट्रस्ट संचालित क्रीडा – विज्ञान सांस्कृतिक केंद्र, नौपाडा, ठाणे
स्थापना :  १९९८
सरस्वती क्रीडा संकुल नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेची विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबत शारीरिक जडणघडण होण्यासाठी ११ वर्षांपूर्वी स्व. विमलताई कर्वे यांच्या प्रेरणेतून संस्थेची स्थापना करण्यात आली. आजमितीस सुमारे १००० मुले ४५ प्रशिक्षकांच्या तालमीत विविध खेळांचे धडे क्रीडा संकुलात वर्षभर गिरवितात.  सरस्वती क्रीडा संकुलात ऱ्हिदमिक जिम्नॅस्टिक्स आणि आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्ससोबतच मार्शल आर्ट प्रकारातील ज्युदो, तायक्वांडो आदी खेळ शिकविले जातात. टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम यांसारख्या अंर्तगत खेळांच्या साथीने खो-खो, व्हॉलीबॉल, बॉस्केटबॉल आणि स्केटिंग यांसारख्या मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांच्या सोबतीने पालकांसाठी योगवर्ग, निरोगी शरीरासाठी टेबल टेनिस यांसारख्या खेळांची सुविधा सरस्वती क्रीडा संकुलात उपलब्ध आहे. सहामाही पद्धतीने क्रीडा संकुलाचे शुल्क आकारले जाते. सायंकाळी ५ ते ९.३० या वेळेत सुरू असणाऱ्या ‘बारमाही’ शिबिराला रविवारी सुट्टी दिली जाते.
२) मावळी मंडळ संस्था, चरई, ठाणे (प.),
स्थापना : १९२५
मावळी मंडळ संस्थेची स्थापना १९२५ साली करण्यात आली. संस्थेकडून मुलांसाठी कायमस्वरूपी चालविण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये फुटबॉल, कबड्डी आणि खो-खो या मैदानी खेळासोबतच अ‍ॅथलेटिक्सचे सर्व प्रकार तसेच जिम्नस्टिक्स शिकविले जाते. मावळी मंडळ क्रीडा संकुलात चरई, धोबीआळी, उथळसर आदी भागांतून सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या मुलांचा कल सर्वाधिक आहे. अ‍ॅथलेटिक्सचे सर्व प्रकार तसेच जिम्नस्टिक्स सायंकाळी ६.३० ते ८.०० या दरम्यान शिबिरात शिकविले जाते. त्यानंतर रात्रौ ८ ते १० पर्यंत कबड्डी, खो-खो आणि फुटबॉल आदी खेळांसाठी संस्थेचे मैदान उपलब्ध करण्यात येते. मुलांची आणि पालकांची मागणी मान्य करून गेल्या दोन वर्षांपासून जिम्नस्टिक्स खेळाची सुरुवात करण्यात आली आहे.

उन्हाळी शिबिरांचा हंगाम
विशेष मुलांसाठी शिबीर
*  काय : जागृती पालक संस्था, ठाणे यांच्यातर्फे  विशेष मुलांसाठी प्रशिक्षण शिबीर. सुप्रसिद्ध चित्रकार विजयराज बोधनकर यांच्याकडून मुलांना चित्रकलेचे धडे, तनुजा कंटक यांच्याकडून नृत्य आणि गायनाची शिकवणी. आदिती आचार्य यांच्याकडून हस्तकलेचे प्रशिक्षण
*  कधी : ९ आणि १० मे
*  कुठे : जुने ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्रांगण, मनोरुग्णालयाजवळ,
ठाणे (प.)
*  संपर्क : ९३२२९५१५४६
कोकण शिबीर
*  काय : जिज्ञासा ट्रस्ट, ठाणेतर्फे इयत्ता ६वी ते १०वीच्या विद्यार्थ्यांकरिता कोकण शिबिराचे आयोजन करण्यात आले आले आहे.
*  कुठे : पानवळ, जि. रत्नागिरी
*  कधी : ११ ते १५ मे  
*  संपर्क : ०२२-२५४०३८५७.
उन्हाळी ज्युडो शिबीर
*  काय : मुलामुलींसाठी प्रशिक्षितांकडून उन्हाळी ज्युडो शिबीर
* कधी : १५ मेपर्यंत
* कुठे : सरस्वती क्रीडा संकुलाचे मैदान, मल्हार हॉटेलसमोर, ठाणे (प.)
* संपर्क : ९९२०४१४८८३ आणि ८९७६९५८६४२
उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण
* काय : ठाणे जिमखाना क्रिकेट अकादमीच्या वतीने  ८ ते २५ वर्षे वयोगटातील मुलांना प्रशिक्षण.
* कधी : २९ मे पर्यंत
* कुठे : ठाण्यातील ऑफिसर्स क्लब, ठाणे जिमखाना, बारा बंगलो, कोपरी, ठाण (पू.)
* संपर्क : ९७६८५७८२१२ आणि ९८६७८७९४५१
मैदानी खेळांचे उन्हाळी शिबीर
*काय :  ४ ते १२ वयोगटासाठी मैदानी खेळांचे शिबीर.
* कधी : २३ मेपर्यंत, वेळ : सायंकाळी ६.०० ते ७.३०
* कुठे : सरस्वती क्रीडा संकुलाचे मैदान, मल्हार हॉटेलसमोर, ठाणे (प.)
* संपर्क : ९८३३०५८५३२ आणि ९९३०३४३७४२
क्रीडा प्रशिक्षण शिबीर
* काय : श्री हनुमान व्यायमशाळेतर्फे विविध खेळांचे प्रशिक्षण शिबीर
* कधी : २३ मेपर्यंत
* कुठे : श्री हनुमान व्यायाम शाळेचे पटांगण, ठाणे (प.)
* संपर्क : ९८६९४१२७८० आणि ७५०६३८१००१  
* उन्हाळी शिबीर
* काय : सरस्वती क्रीडा संकुल आणि जिम्नॅस्टिक्स विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने मनोरंजनात्मक शिबीर.
* कधी : १५ मेपर्यंत
* कुठे : सरस्वती क्रीडा संकुल, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)
* संपर्क : ९३२४३६०४११.