सुगंधी तेलनिर्मिती करणाऱ्या रोपटय़ांची विक्री व प्रशिक्षण

मुलुंडच्या वझे केळकर महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या दर्जात्मक रोपांची लागवड करण्यात येत असून भारतातील काही शेतकरी आणि महाविद्यालयाच्या प्रयत्नातून या रोपांपासून सुगंधी तेलाची निर्मिती केली जात आहे. शासन आणि महाविद्यालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग यांच्या ‘एरोमेटिक डिफरंट प्लांट टिशू कल्चर प्रोडक्शन’ या प्रकल्पा अंतर्गत हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात वाढणारी रोपे एका विशिष्ट आकाराची झाल्यावर शेतकऱ्यांना विकण्यात येत असून त्यापासून सुगंधी तेल तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.  विशेष म्हणजे तेलाची खरेदी महाविद्यालयातर्फे करण्यात येत असल्याने सुगंधी तेलाच्या निर्मितीतून या शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा, बारामती या ठिकाणांसह कर्नाटक, पठाणकोट या ठिकाणच्या दहा हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
Exam fee waiver for students of class 10th 12th Pune news
मोठी बातमी: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी, परीक्षा शुल्काची प्रतिपूर्ती ऑनलाइन पद्धतीने
mumbai, National medical Commission, 872 Applications, Postgraduate Medical Courses, Increase,
नवीन पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांसाठी ८७२ महाविद्यालयांचे अर्ज

वझे केळकर महाविद्यालयाच्या प्रांगणात जैवतंत्रज्ञान विभागातर्फे पचोली, जिरेनिअम, सिट्रोनेला, वेडिवर अशा रोपांची लागवड करण्यात येत आहे.  ही रोपे शेतकऱ्यांना विशिष्ट दरात विकण्यात येतात. शेतकरी या रोपांचे आपल्या जागेत संगोपन करुन साधारण तीन महिन्यानंतर रोपांच्या पानांपासून सुगंधी तेलाची निर्मिती करतात. महाविद्यालयाच्या वैज्ञानिक संशोधन केंद्रातर्फे एका वेळी तीन ते चार लाख टिश्यू रोपांची लागवड टेस्ट टय़ूबमध्ये होत असते. कालांतराने महाविद्यालयाच्या आवारात असणाऱ्या ‘ग्रीन हाऊस’ या रोपांसाठी असलेल्या विशिष्ट जागेत या रोपांची लागवड केली जाते. आठवडय़ाच्या प्रत्येक शनिवारी शेतकरी महाविद्यालयाकडून या रोपांची खरेदी करतात. शासनाच्या जैवतंत्रज्ञान विभागातर्फे महाराष्ट्राबाहेर असणाऱ्या शेतकऱ्यांना लागणारी रोपे पोहचवण्यासाठी महाविद्यालयाशी संपर्क साधला जातो. शासनातर्फे सांगण्यात येणाऱ्या आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना महाविद्यालयातून रोपे पुरवण्यात येतात. या रोपांच्या वाहतुकीसाठी खर्च शासनातर्फे करण्यात येतो. शेतकऱ्यांनी एकदा रोपांची लागवड केल्यास सलग तीन वर्षे या रोपांमध्ये सुगंधी तेलाची निर्मिती होण्याची क्षमता असते. महाविद्यालयातर्फे शेतकऱ्यांकडून या रोपांची पाने वा सुगंधी तेल विकत घेतले जात असल्याने शेतकऱ्यांना सलग तीन वर्षे कायम नफा होतो.  पठाणकोठमध्ये शेतकऱ्यांनी एका वेळी तीनशे ते चारशे लिटर सुगंधी तेलाची निर्मिती केल्याने त्यांचा सहभाग वाढल्याचे  प्राचार्य डॉ.बी.बी.शर्मा यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना नफा

या रोपांपासून तयार करण्यात येणाऱ्या सुगंधी तेलाला उत्तम किंमत मिळत आहे. पचोली वनस्पतींपासून निघणारे तेल ५००० ते ६००० रुपये एक लिटर, पामरोझा आणि सिट्रोनेला या वनस्पतींपासून काढण्यात येणारे सुगंधी तेल १२०० ते १८०० रुपये एक लिटर तसेच जिरेनिअम वनस्पतीपासून निघणारे तेल १६००० ते १८००० रुपये प्रति लिटर दराने विकले जाते.