केंद्राचा ख्रिस्ती धर्माशी संबंध नसल्याचा धर्मगुरूंचा दावा;
तर बचावासाठी संघटनेचा आझाद मैदानात मोर्चा
प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केल्यास असाध्य रोग बरे होतात, असा प्रचार करत भुईगाव येथे कार्यरत असलेले ‘आशीर्वाद’ केंद्र बंद करण्यात आल्यानंतर या मुद्यावरून वसईत नवीन वाद निर्माण होऊ लागला आहे. एकीकडे, हे केंद्र चर्च नसून त्याचा ख्रिस्ती धर्माशी काहीही संबंध नाही, असा सूर वसईतील प्रमुख धर्मगुरूंनी आळवला,. तर दुसरीकडे या केंद्राच्या संचालकाच्या बचावासाठी एका संघटनेने गुरुवारी आझाद मैदान येथे एक मोर्चा काढला.
वसईच्या भुईगाव येथे सॅबेस्टीन मार्टीन याने आशिर्वाद नावाचे केंद्र सुरू केले आहे. गेल्या अनेक वर्षांंपासून तेथे प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केल्यास असाध्य रोग बरे केल्याचा दावा केला जात आहे. त्याच्या चमत्काराच्या चित्रफितीे समाजमाध्यमावर झळकल्यानंतर सर्वत्र खळबळ उडालीे आणि कारवाईचीे मागणीे जोर धरू लागलीे. वसई पोलिसांनी याप्रकरणीे अंधश्रद्धा निमूर्लन कायद्यानुसार सॅबेस्टीन मार्टीन याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याच्या दोन साथीदारांना अटक केलीे आहे. मार्टीन रुग्णालयात दाखल झाल्याने अटक करण्यात आलेलीे नाही.
वसईतल्या प्रमुख धर्मगुरूंनी या केंद्रावर जोरदार आसूड ओढले आहेत. प्रसिद्ध विचारवंत आणि धर्मगुरू फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी या केंद्राचा चर्चशी काही संबंध नसल्याचे जाहीर केले आहे. त्याचीे कार्यपद्धतीे कॅथोलिक धर्माला मान्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले.
काही वर्षांपूर्वी वसईचे तात्कालिन बिशप थॉमस डाबरे यांनी या केंद्राच्या चौकशीसाठी समितीे नेमलीे होतीे. परंतु मार्टीन बिशपांनाच मानत नसल्याने त्याने काहीच सहकार्य केले नसल्याचे दिब्रिटो म्हणाले. वसईतल्या सामाजित चळवळीतले अग्रणीे असेलल्या फादर मायकल जी यांनीही हे चमत्कार प्रभू येशूच्या नावावर खपविले जात असल्याबद्दल टीका केली.
प्रसिद्ध कवीे आणि वसईच्या चळवळीतीेल नेते सायमन मार्टीन हे मात्र, सॅबेस्टीनच्या बचावासाठी पुढे आले आहेत. सॅबेस्टीनने २० हजार लोकांना बरे केले आहे असे ते म्हणाले. हिंदू धर्मातही चमत्कार आहेत. बायबलच्या पानापानावर चमत्कार आहेत. मग बायबलवर बंदी आणणार का, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान मार्टीनच्या बचावासाठी अल्फा ओमेगा ख्रिस्ती महासंघ या संघटनेने गुरूवारी आझाद मैदानात मोर्चा आणला होता. मार्टिनवरील गुन्हे मागे घ्या, चर्चला लावलेले सील काढून टाका आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.