News Flash

‘रुणवाल माय सिटी’तल्या विलगीकरण केंद्रावरुन कर्मचारी आणि नागरिक यांच्यात वाद

कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्याचा आरोप

दिवा-मानपाडा रोडवर असलेल्या रुणवाल माय सिटी या इमारतीत विलगीकरण केंद्र उभारण्यास नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे. तरीही कर्मचाऱ्यांनी इमारतीत येण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर महापालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये वाद झाला. कर्मचारी आमच्यासोबत अरेरावी करत आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे. घटनास्थळी पोलीसही उपस्थित झाले. दिवा-मानपाडा रोडवर असलेल्या रुणवाल माय सिटीमध्ये हा प्रकार झाला आहे.

काय आहे प्रकरण?
ठाणे शहर, दिवा-मानपाडा रस्त्यांवरील नव्याने उभारण्यात आलेल्या गृहसंकुलांमध्ये विक्री झालेल्या आणि तयार ताबा अशा स्थितीत असलेल्या घरांमध्ये करोना रुग्णआंचे निवारा केंद्र सुरु करण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला. घोडबंदर, दिवा यासारख्या भागात मोठ्या विकासकांच्या गृहनिर्माण वसातींमधील तीन हजारांहून अधिक घरे करोना रुग्णांचं अलगीकरण, विलगीकरण त्यांच्यावर उपचार यासाठी अधिग्रहित केली जात आहेत. यासाठी मूळ मालकाची कोणतीही संमती घेतली जात नसल्याने संताप व्यक्त होतो आहे.

अगदी अशीच घटना आज दिवा-मानपाडा रोडवर असलेल्या माय रुणवाल सिटीमध्ये घडली. या ठिकाणी जेव्हा महापालिकेचे अधिकारी आले तेव्हा त्यांच्यात आणि नागरिकांमध्ये वाद झाला. संमती नसताना तुम्ही विलगीकरणासाठी घरं ताब्यात कशी काय घेऊ शकता असा प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. मात्र पालिकेचे कर्मचारी जेव्हा इमारतीत शिरु लागले तेव्हा नागिरकांमध्ये आणि त्यांच्यात वाद झाला. कर्मचाऱ्यांनी आमच्यासोबत अरेरावी केली असा आरोप आता येथील नागरिकांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 3:06 pm

Web Title: dispute between mahapalika staff and citizens over corona center at runwal my city scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 ठाणे: निवृत्तीच्या दिवशीच पालिका कर्मचाऱ्याचा करोनामुळे मृत्यू; एक कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी
2 धक्कादायक! करोनाबाधित महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी बॅगबाहेर काढला मृतदेह; १८ जणांना झाला संसर्ग
3 खरेदीदारांच्या परवानगीविनाच नवी घरे करोना केंद्रांसाठी! 
Just Now!
X