News Flash

वनवासी कल्याण आश्रमात दिवाळी साजरी

कल्याण आश्रमातील मुलांसोबत ईगल ब्रिगेड व नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली.

डोंबिवलीतील वनवासी कल्याण आश्रमातील मुलांसोबत ईगल ब्रिगेड व नवयुवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. एका छोटेखानी कार्यक्रमात मणीपूर, नागालॅण्ड भागातून आलेले विद्यार्थी या दिवाळी कार्यक्रमात सहभागी झाले होते.

मणीपूर, नागालॅण्ड भागातील सतरा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमात आले आहेत. या विद्यार्थ्यांनाही दिवाळी सणातील उत्साहात सहभागी करून त्यांचा आनंद द्विगुणित करावा या उद्देशाने ईगल ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी भोजन, फराळाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. विद्यार्थी या कार्यक्रमात उत्साहाने सहभागी झाले होते. नितेश चांदसकर, रघुनाथ मिश्रा, स्वप्निल चौगुले, विकास थोरात, संजय गायकवाड, मंडळाचे डॉ. सुभाष जावडेकर, योगेश वागळे, पुष्कर साने, संदीप कुलकर्णी, चिराग ठक्कर, योगेश पाठक, परेश वढेकर, हितेन गावडे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 12:01 am

Web Title: diwali celebrate at kalyan ashram
Next Stories
1 ठाणे परिवहन सेवेची हेल्पलाइन सुरू
2 भाजपमध्ये अजून बरीच ‘बॉम्बाबॉम्ब’ होणं बाकी- उद्धव ठाकरे
3 शिवसेनेचे राजेंद्र देवळेकर कल्याण-डोंबिवलीचे नवे महापौर
Just Now!
X