News Flash

दिवाळीच्या आनंदात सामाजिक भानाची ‘साखर’!

दिवाळी पहाटसारख्या संगीत मैफलींना हजेरी लावून दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे.

विवेकानंद केंद्राने गेल्या वर्षी पासून आदिवासी पाडय़ांवर फराळ वाटपाचा कार्यक्रम करत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बदलापुरातील विविध संस्थांच्या आदिवासी पाडे, अनाथ आश्रम, विशेष मुलांच्या आश्रमांना भेटी
सर्वसाधारणपणे सहृद आणि मित्रमंडळींच्या गाठीभेटी घेत, शुभेच्छांचे आदानप्रदान करीत आणि दिवाळी पहाटसारख्या संगीत मैफलींना हजेरी लावून दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे. मात्र त्याचबरोबर गेली काही वर्षे आजूबाजूच्या गाव-पाडय़ांवरील वंचित समाजासोबत दिवाळी साजरी करण्याची सामाजिक जाणीव मूळ धरत आहे. यंदा बदलापूरमध्ये याचा प्रत्यय आला. बदलापुरातील अनेक संस्थांनी शहराच्या आजूबाजूच्या परिसरातील आदिवासी पाडे, अनाथ आश्रम, विशेष मुलांचे आश्रम यांना फराळ वाटप व भेटीगाठी घेऊन, त्यांच्यासोबत फटाक्यांची आतषबाजी करत दिवाळी साजरी केली. आपली दिवाळी वंचित घटकांसोबत करून या संस्थांनी केलेल्या या सामाजिक कार्यक्रमांचे कौतुक होत तर आहेच, मात्र गरजूंच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच आमचा दिवाळीचा आनंद असल्याचे अनेकांनी सांगितले.

विवेकानंद केंद्र, बदलापूर शाखा
विवेकानंद केंद्राने गेल्या वर्षी पासून आदिवासी पाडय़ांवर फराळ वाटपाचा कार्यक्रम करत दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा त्यांनी अंबरनाथ तालुक्यातील सावरा येथे प्रथम २५० लोकवस्ती असलेल्या आदिवासी पाडय़ावर प्रत्येकाला दिवाळीच्या फराळाचा पुडा दिला. तर, दुसऱ्या दिवशी वांगणीजवळील बेडीस वाडी येथे एकूण ५ वस्त्यांमधील १५०० जणांना फराळा दिला. केंद्राचे ४० कायकर्ते स्वत: या वस्त्यांवर जाऊन फराळ व मिठाई देत होते. असे केंद्राचे कार्यकर्ते यशोधन जोशी यांनी सांगितले.

रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था, बदलापूर
बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांची ही संस्था दरवर्षी आदिवासी भागात मिठाईचे वाटप करते. शहराजवळील कोंडेश्वर येथील धामणवाडी, ताडवाडी, भोज गाव, छोटे वऱ्हाड, सावरोली आदी ठिकाणच्या वस्त्यांवर जाऊन मिठाईचे वाटप केले. गेली अनेक र्वष ही संस्था खंड न पाडता हा उपक्रम नियमित करत आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष रमेश महाजन यांनी दिली.

आदिवासी आश्रमशाळा, लव्हाळी
अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी या आदिवासीबहुल गावात असलेल्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत कंदील व दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी व मिठाईचे वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली. बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिक्षक रमेश बुटेरे यांनी यासाठी पुढाकार घेत ही दिवाळी साजरी केली. यावेळी आश्रमशाळेतील ४५० निवासी विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला व त्यांच्या हस्ते फटाके फोडण्यात आले. असे बुटेरे यांनी सांगितले.

आदिवासी आश्रमशाळा, लव्हाळी
अंबरनाथ तालुक्यातील लव्हाळी या आदिवासीबहुल गावात असलेल्या आदिवासी मुलांच्या आश्रमशाळेत कंदील व दिव्यांची रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी व मिठाईचे वाटप करत दिवाळी साजरी करण्यात आली. बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिक्षक रमेश बुटेरे यांनी यासाठी पुढाकार घेत ही दिवाळी साजरी केली. यावेळी आश्रमशाळेतील ४५० निवासी विद्यार्थ्यांना फराळ देण्यात आला व त्यांच्या हस्ते फटाके फोडण्यात आले. असे बुटेरे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 2:12 am

Web Title: diwali celebration in tribal areas
Next Stories
1 शिवपुतळ्याच्या देखभालीसाठी कल्याणमधील तरुणांचा पुढाकार
2 नारायण सुर्वे यांच्यामुळे लेखनाचे बळ!
3 ठाणे, कल्याणात राज्य नाटय़ स्पर्धेची रंगत
Just Now!
X