|| पूर्वा साडविलकर

कागद किंवा अन्य साहित्यापेक्षा नव्या प्रकाराला अधिक मागणी; विविध प्रतिकृतींच्या पणत्या आकर्षणाचे केंद्र:- राज्यातील प्लास्टिकबंदीच्या पाश्र्वभूमीवर बाजारात पर्यावरणपूरक मातीचे कंदील विक्रीसाठी उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहेत. ग्राहकांकडूनही या आकर्षक अशा कंदिलांना मोठी मागणी असून इतर साहित्यापासून तयार केलेले कंदील विकत घेण्याऐवजी मातीचे कंदील विकत घेण्यास ग्राहक प्राधान्य दर्शवत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. तसेच हत्ती, मोर, कासव या प्राण्यांच्या प्रतिकृती असलेले दिवेही बाजारात दाखल झाले आहेत.

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Indiscriminate firing in nagpur by criminal over money of MD
नागपुरात एमडीच्या पैशावरून गुन्हेगाराचा अंधाधुंद गोळीबार, कुख्यात टोळ्या पुन्हा…

अनेक वर्षांपूर्वी बांबूच्या काडय़ा आणि कागद यांच्या मदतीने घरातच बनवलेले कंदील वापरले जात. नंतर त्यांची जागा प्लास्टिकच्या कंदिलांनी घेतली; परंतु गेल्या काही वर्षांत पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती होत असल्याने नागरिक प्लास्टिकच्या कंदिलांना आता सोडचिठ्ठी देऊ लागले आहेत. त्यातच यंदा मातीपासून तयार केलेल्या कंदिलांचा पर्याय उपलब्ध झाल्याने या नव्या प्रकाराकडे ग्राहक आकृष्ट होत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. या कंदिलाची किंमत २०० ते ६०० रुपये इतकी आहे.

कोलकाता, आजमगड आणि गुजरात येथून ठाणे तसेच आसपासच्या उपनगरांत दिव्यांची आवक होत असते. यंदाच्या दिवाळीत बाजारात दिव्यांमध्ये वेगवेगळे प्रकार आलेले पाहायला मिळत आहेत.  दीपथालीची किंमत १०० ते ३०० रुपये, भीवरी दिवा १२० ते २०० रुपये, कासव दिवा १०० रुपये, हत्ती दिवा १५० रुपये या किमतीत ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. तसेच वेगवेगळे नक्षीकाम केलेले आणि वेगवेगळ्या रंगांनी सजविलेल्या साध्या पणत्याही ग्राहक खरेदी करत आहेत.

दिवाळीत ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे दिवे बाजारात उपलब्ध झाले आहेत. जास्त करून मातीचा कंदील, कासव दिवा, हत्ती दिवा आणिमोर दिवा या दिव्यांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे, असे  कंदील- दिवे विक्रेते वसीम देवरिया यांनी सांगितले.

पणत्यांच्या किमतीत वाढ

गुजरातमधून जास्त प्रमाणात दिव्यांची आवक होत असते. या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये पूरस्थिती उद्भवली होती. कुंभारकाम करणाऱ्या व्यावसायिकांच्या दुकानांत पाणी शिरल्यामुळे मातीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. परिणामी, यंदाच्या दिवाळीत बाजारात पणत्यांची आवक फार कमी झाली असून त्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. छोटय़ा पणत्यांची जोडी यंदाच्या वर्षी १० ते ३० रुपयांना मिळत आहे तर रंगीत पणत्यांची जोडी आकारानुसार २० ते २०० रुपयांना उपलब्ध आहे.