X

घोडबंदरमध्ये डॉक्टरला मारहाण

कासारवडवलीतील यशराज पार्कच्या तळमजल्यावर डॉ. दरणदळे यांचा दवाखाना आहे.

ठाणे: घोडबंदर येथील कासारवडवली भागातील बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रशांत दरणदळे यांच्यावर दोन अनोळखी मारेकऱ्यांनी सोमवारी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात डॉ. दरणदळे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. त्यांच्या अटकेनंतरच हल्ल्याचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. कासारवडवलीतील यशराज पार्कच्या तळमजल्यावर डॉ. दरणदळे यांचा दवाखाना आहे. सोमवारी रात्री काम आटोपून ते घरी जाण्यास निघाले. दवाखान्याजवळ त्यांनी कार उभी केली होती. ते कारजवळ येताच तेथे उभे असलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. लहान मुलांना मारतोस काय, असे विचारत हल्लेखोरांनी मारहाण केल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली.