12 December 2017

News Flash

डॉक्टरचा महिलेवर बलात्कार

तांबे याने तपासणीच्या बहाण्याने तिच्यावर रुग्णालयातील एका खोलीत बलात्कार केला.

प्रतिनिधी, ठाणे | Updated: August 22, 2017 2:26 AM

प्रातिनिधिक छायाचित्र

नौपाडा परिसरातील ‘निर्मिती’ रुग्णालयात सरोगसीच्या वैद्यकीय तपासणीसाठी गेलेल्या २१ वर्षीय महिलेवर डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. प्रतीक तांबे याला याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेकडे या गुन्ह्य़ाचा तपास देण्यात आला आहे. ठाण्यातील नौपाडा भागात निर्मिती रुग्णालयात पीडित महिला सरोगसीच्या वैद्यकीय तपासणीसाठी शुक्रवारी सकाळी गेली होती. त्या वेळी रुग्णालयात असलेल्या तांबे याने तपासणीच्या बहाण्याने तिच्यावर रुग्णालयातील एका खोलीत बलात्कार केला. पीडित महिलेने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला; मात्र आरोपी डॉक्टरने हाताने तिचे तोंड दाबून ठेवले. तसेच या प्रकाराविषयी कुठेही वाच्यता करू नये म्हणून त्याने तिला धमकावले. दरम्यान, पीडित महिलेने  तांबे याच्याविरोधात तक्रार दिली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक राजश्री शिंदे करीत आहेत.

First Published on August 22, 2017 1:01 am

Web Title: doctor held for raping woman in thane
टॅग Rape,Rape In Thane