19 September 2020

News Flash

अखेर मातीचा ढिगारा हटविला

इंदिरा चौकातील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होते.

रस्त्यावरील अडथळा दूर झाल्याने नागरिकांचा जीव भांडय़ात 

पावसाला सुरुवात झाली तरी शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरूआहेत. कामे कधी पूर्ण होणार याविषयी साशंकता असली तरी किमान रस्ते खोदताना त्यातून निघालेला मातीचा ढिगारा तरी तेथून हलवावा इतकीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. मात्र बहुतेकदा हे होत नसल्याने रहिवाशांची अडवणूक होते. राजकीय प्रतिनिधी केवळ आदेश देऊन जातात, मात्र कार्यवाही होताना दिसत नाही. शहरातील इंदिरा चौकातही अशीच स्थिती होती. या संदर्भातले वृत्त लोकसत्ताच्या ‘वाचक वार्ताहर’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली आली आणि त्यांनी अखेर येथील वाशी, पनवेल बस स्थानकालगत असलेला मातीचा ढिगारा हटविला.

इंदिरा चौकातील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू होते. भूमिगत सेवा वाहिन्यांसाठी खड्डे खोदण्यात आले परंतु या खड्डय़ातून उपसण्यात आलेले  मातीचे ढिगारे हे तसेच ठेवले होते ते आता हटविल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

आता बाकीची कामे पूर्ण होऊन हा रस्ता मोकळा होण्याची आम्ही वाट पाहत आहोत, अशी प्रतिक्रिया रोहिणी राजाध्यक्ष यांनी व्यक्त केली.

‘वाचक वार्ताहर’ वृत्ताची दखल

इंदिरा चौकातील रस्त्याचे गेले अनेक महिने काम सुरू आहे. रस्त्याच्या सिमेंट क्राँक्रीटीकरणाचे तसेच पेव्हरब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. परंतु भूमिगत सेवा वाहिन्यांचे काम बाकी होते. त्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ातील मातीचा ढिगारा येथे रस्त्याच्या बाजूलाच टाकलेला होता. खोदलेला रस्ता, मातीचे ढिगारे, रिक्षा थांब्यावरील रिक्षांची गर्दी यामुळे येथील प्रवाशांना अनेक गैरसोयींचा सामना करावा लागत होता. पावसाला सुरुवात झाल्यावर या अडचणींत आणखीनच भर पडली. पावसामुळे मातीच्या ढिगाऱ्यातून वाट काढीत प्रवाशांना वाशी, पनवेलला जाण्यासाठी बस पकडावी लागत असे. लोकसत्ताच्या ‘वाचक वार्ताहर’ वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनाने अखेर मंगळवारी सायंकाळी येथील मातीचा ढिगारा त्वरित हटविला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:33 am

Web Title: dombivali civilians problem
Next Stories
1 ठाणे परिसरात ७० हजार वृक्षांची लागवड
2 भाजपच्या ‘विकासपर्व’ला डोंबिवलीकरांचा थंड प्रतिसाद 
3 दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना ‘स्पंदन’ चे अर्थसाहाय्य
Just Now!
X