News Flash

३३६ विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी दात्यांचा पुढाकार

करोनाच्या संकटात अनेकांना आपल्या हातच्या रोजगारावर पाणी सोडावे लागले, तर व्यवसाय उद्योगातही अनेक अडचणी आल्या.

विद्यार्थी विकास योजनेतून १ कोटी ७९ लाखांची मदत

बदलापूर : आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणून कुणी गुणवंत विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि त्याला आवडत्या शाखेत प्रवेश घेता यावा या संकल्पनेवर गेल्या १३ वर्षांपासून काम करणाऱ्या विद्यार्थी विकास योजनेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षांत ३३६ विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणासाठी तब्बल १ कोटी ७९ लाखांची मदत मिळवून दिली आहे. शिक्षणासोबतच आर्थिक विवंचनेत सापडलेल्या काही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठीही संस्थेने मदतीचा हात पुढे केला असून अशा कुटुंबाना एकूण ३ लाख ३७ हजार रुपयांची मदत देऊ  केली आहे. गेल्या काही वर्षांपासून संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबवला जात असून त्यासाठी दाते नियमितपणे मदत देत असतात. त्यामुळे आतापर्यंत ८३३ विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी आधार मिळाला आहे.

करोनाच्या संकटात अनेकांना आपल्या हातच्या रोजगारावर पाणी सोडावे लागले, तर व्यवसाय उद्योगातही अनेक अडचणी आल्या. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या विद्यार्थ्यांपुढे उच्चशिक्षणासाठी लागणाऱ्या खर्चाचा पेच आहे. अशा पेचातून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी ठाण्यातील विद्यार्थी विकास योजनेतून १ कोटी ७९ लाख रुपयांची मदत मिळवून देण्यात आली आहे. आर्थिक स्थिती हलाखीची आहे म्हणून गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात जाऊ  नये. त्याला हव्या त्या विद्याशाखेत प्रवेश घेता यावा यासाठी विद्यार्थी विकास योजना गेल्या १३ वर्षांपासून कार्यरत आहे. गेल्या १३ वर्षांत संस्थेच्या माध्यमातून ८३३ विद्यार्थ्यांना एकूण ७ कोटी ६१ लाखांची मदत करण्यात आली आहे. यासह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील सहा शाळांच्या पुननिर्माणासाठी आणि शाळेच्या आधुनिकीकरणासाठी ३ कोटी २२ लाखांची मदतही देण्यात आली आहे. चांगल्या गुणांच्या आधारावर देश-विदेशातील नामांकित शिक्षण संस्थेत प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना ही संस्था आर्थिक मदत मिळवून देते. करोनाच्या काळात आर्थिक संकट आणखी गडद झाल्याने यंदा अधिक विद्यार्थ्यांना मदतीने गरज लागणार आहे. त्यामुळे समाजातील सर्वच थरांतील व्यक्तींनी या योजनेला मदत केल्यास अनेकांची उच्चशिक्षणाची दारे खुली होतील, असे आवाहन संस्थेचे संस्थापक रवींद्र कर्वे यांनी केले आहे. राज्यभरातील विविध दाते नियमितपणे या योजनेला मदत करतात. अशा दात्यांची संख्या ४१५ असून २५६ हितचिंतकही संस्थेला सहकार्य करतात. विविध नामांकित कंपन्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून मदत करून लागले आहेत. या योजनेतून मदत मिळालेल्या शंभरहून अधिक जणांना आता नोकऱ्या मिळाल्या असून ते लाभार्थीही आता या योजनेत स्वेच्छेने मदत करतात.

निवड प्रक्रिया

इयत्ता दहावीत नव्वद टक्क्यांहून अधिक, बारावीत किमान ७५ टक्के गुण तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांमध्ये नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यास पात्र होण्यासाठी आवश्यक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मदतीसाठी निवड होते. संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन परिस्थिती पाहून निवड करतात. विद्यार्थी आणि दाते यांची माहिती एकमेकांना दिली जात नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 2:30 am

Web Title: donor initiative for higher education of 336 students ssh 93
Next Stories
1 उत्पादन शुल्क विभागाच्या दोन अधिकाऱ्यांसह चार जणांचे निलंबन
2 ठाणे डान्स बार प्रकरणी चार कार्यक्षेत्रीय अधिकारी निलंबित!
3 वसई : आईच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून १८ वर्षीय मुलानेच केली आईची हत्या
Just Now!
X