27 November 2020

News Flash

कल्याण-डोंबिवलीत रुग्णदुपटीचा वेग २०६ दिवसांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील करोना रुग्ण दुप्पट होण्याचा वेग २०६ दिवसांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होऊन सुखरूप घरी परतण्याचे प्रमाण ९५ टक्के आणि मृत्युदर दोन टक्क्यांवर आला आहे. रुग्ण सकारात्मक होण्याचे प्रमाण सहा टक्क्यांवर आले असून काही महिन्यांपूर्वी हे प्रमाण ४६ टक्के होते.

कल्याण-डोंबिवलीमध्ये जून-जुलै ते ऑक्टोबपर्यंत करोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत होता. गेल्या पंधरवडय़ापासून मात्र हे प्रमाण कमी होऊ लागले आहे. मागील सात महिन्यांतील कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील एकूण करोना रुग्णांची संख्या गुरुवापर्यंत ५२ हजार २३ होती. ४८ हजार ६२६ बाधित करोनामुक्त झाले आहेत. सध्या एक हजार ६५२ रुग्ण विविध रुग्णालय, काळजी केंद्रात उपचार घेत आहेत. जून ते सप्टेंबरदरम्यान करोना रुग्णांची संख्या बरीच मोठी होती. गणेशोत्सवानंतर मागील दोन महिने शहरात सुमारे ३०० ते ५०० दरम्यान करोना रुग्ण आढळून येत होते. गेल्या २० दिवसांपासून ही संख्या १०० ते १५० वर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरातील चाचण्यांची संख्याही वाढविण्यात आली आहे. तापसदृश लक्षणे दिसू लागली, की रुग्णांनी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन प्रतिजन चाचणी करून घेणे, चाचणी सकारात्मक आली तर तातडीने उपचार सुरू करणे, आपल्या संपर्कातील, कुटुंबातील सदस्यांच्या करोना चाचण्या करून घेणे, असे प्रकार वाढवले आहेत. पालिकेतर्फे घरोघरचे सर्वेक्षण, साथसदृश रुग्णांवर तातडीने उपचार असे प्रकार सुरू आहेत. त्याचे दृश्य परिणाम दिसू लागल्याने रुग्णसंख्या घटत आहे, असे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले.

प्रशासनाने मागील सात महिने करोना साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांना आता यश येत चालले आहे. संसर्ग, मृत्युदराचे प्रमाण घटले आहे. तरीही रहिवाशांनी गाफील न राहता बाजार, प्रवास करताना करोना संसर्गाचे सर्व नियम पाळावेत. आताही दररोज सुमारे १७०० करोना चाचण्या केल्या जात आहेत.

– डॉ. अश्विनी पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 2:36 am

Web Title: doubling rate in kalyan dombivali improved to 206 days zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 कोकण विभागात रक्तद्रव दानात ठाणे शहर अव्वल
2 शहरबात : ‘चौथी मुंबई’ प्रदूषणाच्या विळख्यात
3 ऑनलाइन शॉपिंगद्वारे फसवणूक
Just Now!
X