News Flash

लोकमान्यांचा बाप्पा’ नाटकातून शांततेचा संदेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे काव्यवाचन प्रदीप कुऱ्हाडे यांनी केले.

अभिनय कट्टय़ावर नाटिकेतून जागृती; उत्सवातील गैरप्रकारांवर प्रकाश
गणेशोत्सव नेमका कशा स्वरूपात साजरा केला पाहिजे, याचे चित्रण करणाऱ्या ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या नाटिकेचे सादरीकरण अभिनय कट्टा येथे करण्यात आले. सामाजिक भान आणि सामाजिक बांधीलकी जपताना अभिनय कट्टय़ाने या कलाकृतीतून समाज जागृतीचा प्रयत्न केला आहे. संकेत देशपांडे लिखित आणि किरण नाकती दिग्दर्शित ‘लोकमान्यांचा बाप्पा’ या नाटकाच्या माध्यमातून सण हे त्रास देण्यासाठी नसून सामाजिक एकोपा जपून शांतता प्रस्थापित करण्यासाठी असतात, असा संदेश देण्यात आला आहे.
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आज फक्त त्यांचाच राहिला आहे का, असा प्रश्न उभा करत आजच्या वास्तविक गणेशोत्सवाचे दर्शन अभिनय कट्टय़ाच्या माध्यमातून करण्यात आले. सामाजिक एकोपा जपण्यासाठी व आपली एकात्मता सर्व समाजाला कळण्यासाठी ब्रिटिश काळातच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला होता. मात्र अलीकडे गणेशोत्सव सण न राहता मंडळांनी त्याचा इव्हेंट करून त्यांना स्पर्धेचे स्वरूप आले आहे. गणेशोत्सवात जुगार खेळणे, रस्त्यावर मंडपांसाठी खड्डे करणे, मोठय़ा आवाजात संगीत लावणे असे अनेक गैरप्रकार केले जातात, याचे दृश्यात्मक चित्रण नाटिकेतून करण्यात आले आहे. याच दरम्यान श्रीधर कोकितकर यांनी देव आहे कुठे? व महेश झिरपे याने आत्मसमर्पण या एकपात्री सादर केल्या. तसेच पाहुणचार ही विनोदी द्विपात्री संकेत घार्गे व अविनाश ओव्हाळ यांनी सादर केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची व्यथा मांडणारे काव्यवाचन प्रदीप कुऱ्हाडे यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 7:07 am

Web Title: drama in ganesh festival
टॅग : Drama,Ganesh Festival
Next Stories
1 महिलेच्या अपघाती मृत्यूप्रकरणी ठेकेदाराची चौकशी
2 घरगुती विसर्जनाला गोंगाट फार!
3 ‘प्रगती’च्या वाटेवर.. आदिवासी!
Just Now!
X