विद्यार्थी आणि वाहतूक पोलिसांमधील जिव्हाळ्याचे नाते अधिक घट्ट व्हावे. उगवत्या पिढीतील विद्यार्थी हाही रस्त्यावरून ये-जा करणारा एक वाहतूक पोलीस आहे. त्यांनाही वाहतूक समस्या, त्यावरील उपायांची माहिती व्हावी या उद्देशातून वाहतूक विभागाच्या डोंबिवली शाखेने आयोजित केलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेत २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

बालभवन येथे या स्पर्धा घेण्यात आल्या. ‘विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती किती जागृत आहे, हे या स्पर्धांच्या माध्यमातून दिसून आले. हा विद्यार्थी उद्याचा भावी नागरिक आहे. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, या उद्देशातून या स्पर्धांचे आयोजन केले होते,’ असे वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत नगराळे यांनी सांगितले.

यावेळी साहाय्यक निरीक्षक काळे, गलिंदे, उपनिरीक्षक चव्हाण, पालवे, शांतता समिती सदस्या सुप्रिया कुलकर्णी, पाटकर विद्यालयाचे शिक्षक पाटील, तुषार बांदेकर, जोशी उपस्थित होते.