वसईतील कुख्यात ड्रग तस्करला अटक

नववर्षांच्या स्वागतानिमित्त होणाऱ्या पाटर्य़ामधील मद्यसेवन आणि मद्यप्राशन करून वाहन चालवण्याचे प्रकार रोखण्यासाठी एकीकडे वसई पोलिसांनी कठोर पावले उचलली असतानाच यातील काही पाटर्य़ामध्ये अमली पदार्थाचे वाटप होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. पोलिसांनी वसईतील कुख्यात ड्रग तस्करला अटक केली असून त्याच्या चौकशीत शहरातील खासगी बंगले तसेच क्लबमध्ये होणाऱ्या पाटर्य़ात अंमली पदार्थाचे सेवन होणार असल्याची माहिती हाती लागल्याचे समजते.

वसई विरार हा किनारपट्टी आणि पूर्वेकडील जंगलानी व्यापलेला भाग येतो. किनारपटट्ीवरलीे रिसॉर्टस आणि जंगलातीेल बंगल्यांत नेहमीेच पार्टी स्पॉट म्हणून ओळखले जातात. ३१ च्या रात्री या ठिकाणीे पाटर्य़ाना उधाण येत असते. सगळ्या रिसॉर्टसमध्ये नववर्षांच्या स्वागतासाठी पाट्र्याचे आयोजन करण्यात येत असते. यंदाच्या पाट्र्यामध्ये अमलीे पदार्थाचा वापर मोठय़ा प्रमाणावर होण्याचीे शक्यता वर्तवलीे जात आहे. त्यादृष्टिने पोलिसांनी आपलीे व्यूहरचना केलीे आहे. पाट्र्यामध्ये अमलीे पदार्थाचा होणारा वापर रोखणे हे आमच्यापुढील मोठे लक्ष्य असल्याचे पालघरच्या पोलीस अधीक्षक शारदा राऊत यांनी सांगितले. केवळ वसई विरारच नव्हे तर जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील रिसॉर्टस आणि क्लबमध्ये होणाऱ्या प्रत्येक पार्टीवर आमचे लक्ष असणार आहे, असे त्या म्हणाल्या. ‘आम्ही त्यासाठी खास पथक तयार केले असून प्रत्येक पार्टीमध्ये आमचे पोलीस लक्ष ठेऊन असणार आहे. पार्टीच्या आधी ड्रग पेडलर ( अमलीे पदार्थाचे विक्री करणारे) सक्रीय होत असतात. अशा ड्रगविक्रेत्यांना आम्ही शोधून पकडणार आहोत. त्यामुळे छुप्या पद्धतीेने होणारा अमलीे पदार्थाचा पुरवठा होणार नाही,’ असे त्या म्हणाल्या.

नववर्षांचे स्वागत जरूर करा पण नियमांचे पालन करा, असे अतिरिक्त पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. यावर्षी आम्ही खास नियमावलीे तयार केलीे असून पार्टी आयोजकांना परवाना बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांची तपासणीे केलीे जाईल असेही ते म्हणाले. यापूर्वीच सर्व पाट्र्यामध्ये सीसीटीव्ही लावण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या पार्टीत कोण येणार आहे ते सुद्धा पोलीस तपासू शकणार आहेत.

दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कुख्यात अमलीे पदार्थाचा तस्कर शाहरूख खान (३४) याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आपलीे अटक टाळण्यासाठी त्याने उच्च न्यायालायात अटकपूर्व जामिन देखील केला होता. तो वसईच्या कोळीवाडा येथे येणार असल्याचीे माहितीे मिळाल्यानंतर काशिमीरा पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून अटक केलीे.

अमली पदार्थ रोखण्याचे आव्हान

*अमलीे पदार्थाचा वापर आणि संभावित रेव्ह पाट्र्यावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे सायबर सेल विभाग सोशल साईटवरून दिल्या  जाणाऱ्या पाट्र्याच्या आमंत्रणावर नजर ठेवून आहे.

*या पाटर्य़ा गोपनिय ठिकाणीे होतात तसेच त्यांचे व्यवहार सांकेतिक भाषेतून होत असतात. त्यामुळे तो रोखण्यासाठी पोलिसांचीे मोठी  कसोटी लागणार आहे.

*मुंबई पोलिसांच्या अमलीे पदार्थ विरोधी शाखेने यापूर्वी वसईतून अनेक अमलीे पदार्थाचे व्यवहार करणाऱ्या तस्करांना पकडले आहे.  वसईतून मोठय़ा प्रमाणावर अमलीे पदार्थाचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे ३१ डिसेंबरच्या आधी मोठय़ा प्रमाणावर या तस्करांचीे धरपकड  केलीे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.