News Flash

मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांना दणका

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आठ वाहनचालकांचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या आठ वाहनचालकांचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे. वसईच्या वाहतूक शाखेने ही कारवाई केली आहे. वसई तालुक्यातील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या आठवडय़ात वसई वाहतूक शाखेने मद्यपान करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम सुरू केली होती. वाहनचालकांची तपासणी सुरू असताना यामध्ये हे आठजण   मद्यपान करुन वाहन चालविताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्यावर त्वरित कार्यवाही करून त्यांना १६ हजार रुपये दंड ठोठावला. शिवाय त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2019 4:31 am

Web Title: drunk and drive vehicle license suspended akp 94
Next Stories
1 दरुगधी, पाणीटंचाईसह ध्वनिप्रदूषणचा विळखा
2 रेल्वे रुळावर गर्भवती महिलेचा मृतदेह
3 उल्हासनगरचे राजकारण कलानी कुटुंबाभोवतीच
Just Now!
X