संरचना अभियंत्यांच्या सही, शिक्क्याचा गैरवापर

उल्हासनगर : उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याच्या प्रक्रियेत संरचना अभियंत्याची खोटी स्वाक्षरी करून अर्ज सादर करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा गैरप्रकार संबंधित अभियंत्याच्याच निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या प्रकारामुळे उल्हासनगर महापालिकेच्या नियमानुकूल प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

उल्हासनगर शहरातील ८५५ अनधिकृत बांधकामांच्या प्रकरणावर तोडगा म्हणून राज्य शासनाने शहरात पुन्हा एकदा नियानुकूल प्रक्रिया या राबवण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षांत यासाठी महापालिका आयुक्तांना पदनिर्देशित अधिकारी म्हणून कार्यभार देण्यात आला. उल्हासनगर महापालिकेने एक संकेतस्थळ सुरू करून त्याद्वारे अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केले होते. यासंबंधीची प्रक्रिया या सुरू असताना महापालिकेकडून अधिकृतरीत्या नेमल्या गेलेल्या एका संरचना अभियंत्याची स्वाक्षरी आणि शिक्का चिटकावून ऑनलाइन प्रक्रिया येत बनावट अर्ज सादर केल्याचे उघडकीस आले आहे. विकास नेहते असे या अभियंत्याचे नाव असून त्यांच्या सहीचे तब्बल १४ क अर्ज सादर केल्याचे नेहते यांच्याच निदर्शनास आले आहे. सुरुवातीला अर्ज R मांक १२२८, १२२९, १२४८ आणि १२९१ यामध्ये क अर्जावर वास्तुविशारद म्हणून आपली सही आणि शिक्का संगणकीय पद्धतीने चिकटवण्यात आल्याचे निदर्शनास आले. अधिक तपास केला असता असे १४ अर्ज असल्याचे आढळले. याचा धक्का बसल्याने त्यांनी तात्काळ पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे. हे अर्ज पालिकेचे स्थायी समितीचे सभापती राजेश वधारिया यांनी आयोजित केलेल्या शिबिरात दाखल झाल्याची बाब समोर आली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणी विकास नेहते यांनी पोलीस उपायुक्तांना पत्र लिहून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. माझ्या नावे सल्लागार शुल्काच्या नावाखाली लाखो रुपये उकळल्याचा माझा संशय असून या प्रकरणी स्वंयघोषित वास्तुविशारद दुर्गेशप्रसाद राय आणि १४ मालमत्ताधारकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नेहते यांनी केली आहे.

संबंधित प्रकार महापालिका आयुक्तांना कळवण्यात आला आहे. संरचना अभियंत्यांनी उपस्थित केलेल्या प्रकरणांतील अनियमिततेची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. – डॉ युवराज भदाणे, जनसंपर्क अधिकारी, उल्हासनगर महापालिका.

नागरिकांना वास्तुविशारदांचा दर परवडत नसल्याने नागरिकांच्या सुविधेसाठी शिबीर आयोजित केले होते. यातील काही प्रकरणात अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणांची चौकशी केली जाईल. – राजेश वधारिया, स्थायी समिती सभापती, उल्हासनगर.विकास नेहते यांनी माझ्यासोबत अनेकदा कामे केली आहेत. मात्र शिबिरात अतांत्रिक व्यक्तीने चुकून ऑनलाइन अर्जात ही सही चिटकवल्याचे दिसते आहे. त्यांची कागदावर सही घ्यायची आहे तसेच त्याची कागदपत्रे अद्याप पालिकेत जमा केलेली नाहीत. स्वस्तात प्रक्रिया करत असल्याने माझ्या बदनामीसाठी प्रयत्न केले जात आहेत. -दुर्गाप्रसाद राय, शिबीर आयोजक.