05 April 2020

News Flash

दुर्गाडी पुलाजवळ दुचाकी पोलीस व्हॅन धडकेत पोलिसाचा मृत्यु

अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिसांनी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

संग्रहित छायाचित्र

 

कल्याण- कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी पुलाजवळ मंगळवारी सकाळी रात्रपाळी करुन दुचाकीवरुन कल्याणमधील घरी परतणाऱ्या दोन पोलिसांपैकी एका पोलिसाचा पोलीस व्हॅनला बसलेल्या धडकेत मृत्यू झाला. दुचाकीवरील एक पोलीस गंभीर जखमी झाला आहे. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गौतम आणि संतोष हे दोन्ही पोलीस मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगात नोकरीला आहेत. ते कल्याणमध्ये राहतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लोकल सेवा, खासगी, सार्वजनिक वाहतूक बंद केली आहे. अत्यावश्यक सेवा म्हणून पोलिसांनी कामावर हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे नेहमी लोकलने जाणारे गौतम हे सोमवारी आपल्या सहकाऱ्याला दुचाकीवर कल्याणमधून राहत्या घरून मुंबईतील कामाच्या ठिकाणी गेले होते. रात्रपाळी करुन ते मंगळवारी सकाळी कल्याणमधील घरी येत होते. दुर्गाडी पुलावरुन कल्याणमध्ये प्रवेश करत असताना गौतम यांची दुचाकी आणि समोर असलेल्या पोलीस गस्ती व्हॅन यांची धडक झाली. यामध्ये गौतम जागीच मरण पावले. तर संतोष गंभीर जखमी झाले. दुचाकीवरील चालकाचा ताबा सुटून ती व्हॅनला धडकली की व्हॅन आणि दुचाकीची धडक झाली याविषयी संभ्रम आहे, असे सुत्राने सांगितले. घटनास्थळी बाजारपेठ पोलीस दाखल होऊन पंचनामा करण्यात आला आहे. तपासातून अपघाताचे कारण स्पष्ट होईल, असे सुत्राने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 1:02 am

Web Title: durgadi bridge two wheeler police van accident police death akp 94 2
Next Stories
1 साठेभाजीसाठी धावाधाव!
2 दूधविक्रेत्यांना मारहाण झाल्याने वितरक संतप्त
3 ठाण्यातील हवा प्रदुषण घटले!
Just Now!
X