News Flash

एकनाथ रानडे जन्मशताब्दी समारोपाचा कार्यक्रम

कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे उपस्थित राहणार आहेत.

कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद यांचे शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्या जन्मशताब्दी समारोपाचा कार्यक्रम ‘समिधा’ या नावाने डोंबिवलीत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्ष निवेदिता भिडे उपस्थित राहणार आहेत.
२४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता डोंबिवली पूर्व भागातील टिळकनगरमधील टिळकनगर विद्या मंदिराच्या पटांगणात हा कार्यक्रम होणार आहे. विवेकानंद केंद्राच्या डोंबिवली शाखेच्या प्रमुख मंगला ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात एकनाथ रानडे यांच्या कार्याची चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर निवेदिता भिडे यांचे व्याख्यान होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2015 12:08 am

Web Title: eknath ranade birth centenary programme
Next Stories
1 धावत्या लोकलवर दगड भिरकावल्याने तरुण जखमी
2 शिवाई वक्तृत्व स्पर्धेचे डोंबिवलीत आयोजन
3 पैशांचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने भिवंडीत दोघांची हत्या
Just Now!
X