News Flash

भाजपची जागांची मागणी व्यवहार्य हवी

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे मत; स्वबळाचे संकेत

भाजपची जागांची मागणी व्यवहार्य हवी

ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे मत; स्वबळाचे संकेत

ठाणे महापालिका निवडणुकीत युती व्हावी अशी आमची इच्छा असली तरी भाजपची मागणी व्यवहार्य असावी, असा टोला ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना लगावला. ठाणे महापालिकेत आमचे ५७ नगरसेवक असून अन्य पक्षांतून आलेल्या नगरसेवकांमुळे आमचा आकडा ७५ पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे भाजपने जागांची मागणी करताना विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.

ठाणे महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपची युती होईल की नाही, याविषयी संभ्रमाचे वातावरण आहे. तसेच दोन्ही पक्षांनी सर्वच जागांसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना युतीच्या निर्णयाबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्यांनी युतीबाबत आम्ही सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. तसेच युती व्हावी अशी आमची इच्छा असली तरी भाजपने जागेची मागणी करताना ती व्यवहार्य करावी, असेही त्यांनी सांगितले.

पक्षप्रमुखांचा निर्णय अंतिम

युतीसंदर्भात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सांगत युतीसंबंधीचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे हे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2017 2:37 am

Web Title: eknath shinde
Next Stories
1 उल्हासनगरमध्ये रिपाइं भाजपची साथ सोडणार?
2 मतदारांना ‘रंग’साद
3 आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू!
Just Now!
X