News Flash

उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकारांची मांदियाळी

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे.

उमेदवारांच्या प्रचारासाठी कलाकारांची मांदियाळी
मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांकडून वेगवेगळे फंडे अमलात आणले जात आहेत.

कल्याण-डोंबिवली महापालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना व भाजपमध्ये चुरशीची लढत सुरू झाली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी या पक्षांकडून वेगवेगळे फंडे अमलात आणले जात आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेना आणि भाजपने बडय़ा नेत्यांसोबत सिने कलावंतांची फौजही निवडणूक प्रचारात उतरवली आहे.
शिवसेनेने सुबोध भावे, दिगंबर नाईक, आदेश बांदेकर, शरद पोंक्षे, डॉ. अमोल कोल्हे, नितीन बानगुडे पाटील आदी कलावंतांना प्रचारात उतरवले आहे. हे कलाकार घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेत आहेत. तर शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी भाजपनेही प्रचार मोहिमेत सिने कलावंत सचिन खेडेकर यांची छबी गेल्या काही दिवसांपासून झळकू लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2015 12:50 am

Web Title: election candidates use actors for election campaign
टॅग : Election Campaign
Next Stories
1 ३१ वर्षांनंतर शाळा सोबतींची मैफल
2 निवडणुकीत पाटील, म्हात्रे, गायकवाडांची चलती
3 महासभेवर पोलिसांची नजर
Just Now!
X