कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीसाठीच्या प्रचाराची मुदत शुक्रवारी संपली असून १ नोव्हेंबर
रोजी १२२ पैकी ११७ प्रभागांमध्ये मतदान होणार आहे. २७ गावांमधील दोन प्रभागात संघर्ष समितीचा
बहिष्कार आहे. ३ प्रभागात उमेदवार बिनविरोध निवडून आले
आहेत. मतमोजणी २ नोव्हेंबर रोजी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात होणार आहे. मतदान व मतमोजणी केंद्र परिसरात ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत.
तीन दिवस मद्यविक्री बंद?
निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पालिका हद्दीत शुक्रवारी रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत मद्यविक्री बंद ठेवण्याचा विचार उत्पादन शुल्क व पोलिसांच्या वरिष्ठ पातळीवर सुरू आहे.